अमरावतीत 87 रुग्ण कोरोना क्रियाशील

    दिनांक :01-Jun-2020
|
- 12 नवीन रुग्णांची नोंद
- आतापर्यंत 230 कोरोनाग्रस्त 

covid _1  H x W 
 
तभा वृत्तसेवा
अमरावती,
अमरावतीत कोरोना रूग्णाच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. सोमवारी कोरोनाचे 12 नवीन पुरूष रूग्ण आढळले. त्यात आठ पुरूष, 3 महिला व एक मुलाचा समावेश आहे. सध्या 87 रुग्ण कोरोना क्रियाशील आहे.
 
 
जिल्ह्यात आतापर्यंत 230 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून प्रत्येक्षात 87 रुग्णच कोरोना क्रियाशील आहे व त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तीन रुग्णांना नागपूरात हलविण्यात आले आहे. 15 जणांचा मृत्यू झाला असून 124 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, दसरा मैदान येथील 10 वर्षाचा मुलगा, बुधवारा येथील 18 वर्षाचा युवक, 42 वर्षाची महिला, 52 वर्षाचा पुरूष, 54 वर्षाची महिला, चेतनदास बगीचा येथील 30 वर्षाचा युवक, 61 वर्षाचा पुरूष, अचलपूर तालुक्यातील काकडा येथील 30 वर्षाचा युवक आणि मसानगंज येथील 55 पुरूष, 31 वर्षाची महिला, 75 वर्षाचा पुरूष, गडगडेश्‍वर प्रभागातील शिक्षक कॉलनीतील 47 वर्षाच्या पुरूषाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या 12 रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे थ्रोट स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरातल्या नवीन भागातील कोरोना रुग्ण समोर येत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
 
 
160 प्रलंबित, नवीन 290 पाठविले
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सोमवारी कारोना तपासणी अहवालाचा तपशिल प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 14 हजार 957 नागरिकांची तपासणी झाली आहे. तसेच आजपर्यंत 4 हजार 642 जणांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविले, त्यापैकी 4 हजार 131 जणांचे अहवाल निगेटिव्ह व 230 जणांचे पॉझिटिव्ह आले आहे. त्यातील 15 जणांचा मृत्यू झाला असून 87 जणांवर अमरावतीत तर तिघांवर नागपूरात उपचार सुरू आहे. 124 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 160 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. 121 नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सोमवारी 290 नवीन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. आज 176 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 164 निगेटिव्ह व 12 पॉझिटिव्ह आढळले, असे प्रशासनाने कळविले आहे.
 
 
नागपूरच्या दोन डॉक्टरांनी केली तपासणी
नागपूरच्या मेडीकलच्या कोविड रुग्णालयातील दोन सदस्यीय डॉक्टरांनी सोमवारी अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची तपासणी केली. रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांशी त्यांनी संवाद साधला व कोरोना रुग्णांच्या उपचारा संदर्भात आवश्यक त्या सुचना दिल्या. जिल्हाशल्य चिकित्सकांसोबतही त्यांनी चर्चा केली.