बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी

    दिनांक :01-Jun-2020
|
पाटना,
नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा पुढील आठवड्यात रणिंशग फुंकणार आहे. केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह व्हिडीओ कॉन्फरन्स आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत संपर्क साधणार आहेत, अशी माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने आज सोमवारी दिली.
 
 
bihar_1  H x W:
 
बिहारमधील 243 विधानसभा मतदारसंघांतील किमान एक लाख नागरिकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क साधण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे, अशी माहिती बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी दिली.
 
 
निवडणुकीचा प्रचार या व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून केला जाणार आहे. 9 जून रोजी होणार्‍या व्हर्च्युअल रॅलीस अमित शाह संबोधित करतील. त्यानंतर दुसर्‍या दिवशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे नागरिकांना संबोधित करतील. नड्डा दोन टप्प्यांमध्ये उत्तर आणि दक्षिण बिहारमधील नागरिकांसोबत संवाद साधतील, असेही त्यांनी सांगितले.