रशियाचे कोरोनावरील औषध याच महिन्यात

    दिनांक :01-Jun-2020
|
-कोरोनाविरोधी लढ्याला बळ
 
नवी दिल्ली, 
कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी रशियाने तयार केलेल्या औषधाचे याच महिन्यात या देशातील रुग्णालयांत वितरण केले जाणार आहे. यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला मोठे बळ मिळेल.
 

corona vaccine_1 &nb 
 
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड, रशियाज सोव्हेरीन वेल्थ फंड आणि द केमरार ग्रुप रशियातील रुग्णालयांत अॅव्हिफॅव्हिर औषधांचे 60 हजार डोस वितरित करणार आहे. कोरोना संसर्गावरील ॲव्हिफॅव्हिर हे रशियातील पहिलेच औषध असून, याच्या वैद्यकीय चाचणीदरम्यान बाधितांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे निदर्शनास आले आहे. ॲव्हिफॅव्हिर औषधाला रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. फॅव्हिपिराव्हिर या आधारभूत औषधापासून ॲव्हिफॅव्हिर तयार करण्यात आले. कोव्हिड-19 वरील उपचारासाठी जागतिक मान्यता मिळालेले फॅव्हिपिराव्हिर हे पहिले औषध आहे.
 
 
जूनच्या पहिल्या आठवड्यात ॲव्हिफॅव्हिर औषधांची पहिली बॅच मान्यता मिळवण्यासाठी रशियाच्या संघीय आरोग्य निगराणी सेवेकडे पाठवले जाणार आहे. या औषधाची पहिली बॅच 11 जूनपर्यंत रशियातील रुग्णालयांत पोहोचण्याची अपेक्षा आहे.