कोरोना वीरांना राणी मुखर्जीकडून सलामी

    दिनांक :01-Jun-2020
|
मुंबई :
जगात सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. लॉकडाऊन काळात सर्व नागरिक आपल्या कुटुंबासोबत आहेत. मात्र कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करत आहे. अशा कोरोना वीरांचे सर्वच स्तरातून कोतुक होत आहे. बॉलिवूडकर देखील विविध मार्गांनी या वीरांचा मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेत्री राणी मुखर्जीने देखील एक व्हिडिओ तयार करत पोलिसांचे मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
rani_1  H x W:

'रख तू हौसला' असे बोल असलेला हा व्हिडिओ पोलिसांमधील बळ वाढवत असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओची तसदी घेत मुंबई पोलीस कमिश्नर परमबीर सिंग यांनी एक शेर केला आहे. "रखो दो गज की दूरी, ना दिलों में फासला हम एक हैं " मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलेली ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
 
दरम्यान, या कोरोना संकटात अनेक पोलिसांनी आपले प्राण गमावले आहे. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने आतापर्यंत २७ पोलिसांचा बळी घेतला आहे. गेल्या २४ तासांत ९३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.