संचारबंदीत डाक विभागाने केले 4.43 कोटी रुपयांचे वाटप

    दिनांक :01-Jun-2020
|
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ संचारबंदी असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला अनेक संकटांशी सामना करावा लागत आहे. या नागरिकांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रत्येक जनधन खात्यात सरकारने 500 रुपये जमा केले. पैसे खात्यात तर आले, पण काढायचे कसे असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला. अशा वेळी भारतीय डाक विभागाच्या आधार संलग्न पेमेंट योजनेमार्फत सर्वसामान्यांना गावागावात रक्कम उपलब्ध करून दिली. डाक विभागाच्यावतीने संचारबंदी काळात 4 कोटी 43 लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले.
 
 
post_1  H x W:
 
डाक विभागाच्या प्रत्येक कर्मचार्‍याने व ग्रामीण डाकसेवक यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन पैशांचे वाटप केले आणि या महामारीच्या काळात ग्रामीण भागात खेडोपाडी मदत केली. यवतमाळ जिल्ह्यात या आतापर्यंत भारतीय डाक विभागाने एकूण 21,566 व्यक्तींना पेमेंट केले असून ती रक्कम 4 कोटी 43 लाख आहे. यात यवतमाळ जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात तिसर्‍या क‘मांकावर आहे. या योजनेमध्ये पैसे काढण्यासाठी खातेदारास कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारले जात नाही. डाक विभागामार्फत ही सेवा खातेदाराच्या घरापर्यंतसुद्धा उपलब्ध आहे. सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यवतमाळ डाक विभागाने केले आहे.