नागपुरातली कोरोनाची आजची आकडेवारी धक्कादायक!

    दिनांक :01-Jun-2020
|
-बाधितांची संख्या ५५९
-एक मनपा कर्मचारी बाधित
नागपूर, 
महापालिकेतील एका कर्मचाऱ्यासह नागपुरात सोमवारी दुपारपर्यंत बाधितांमध्ये १९जणांची भर पडली असून बाधितांची संख्या ५५९वर पोहोचली. महापालिकेच्या साथरोग विभागातील कर्मचारी मागील काही दिवसांपासून सतरंजीपुरा, नाईक तलाव-बांगला देश या प्रतिबंधित क्षेत्रात काम करीत होता. त्याच्या स्वॅबचा नमुना एम्समध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो आज पॉझिटिव्ह येताच महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. त्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाèयांचे नमुने लगेचच घेऊन तपासासाठी पाठविण्यात आले. याशिवाय त्याच्या संपर्कात आलेल्यांचा यंत्रणेने शोध शुरू केला. त्याच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन करण्यात आले. तो बाधित आल्याने वाठोडा परिसर प्रतिबंधित करण्यात आला.

igmc_1  H x W:
विविध ठिकाणच्या बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या नमुन्यांची तपासणी मेयो, मेडिकल, निरी, म्हापसू, आयआरएल व एम्स प्रयोगशाळेत निरंतर सुरू आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत १९ नमुने पॉझिटिव्ह आले. एम्स प्रयोगशाळेत वाठोड्यातील एका महापालिका कर्मचारी तसेच ५ लॉ कॉलेजमध्ये क्वारंटाईन असलेल्या नाईक तलाव-बांगला देशमधील ५, असे सहा नमुने पॉझिटिव्ह आले. पाचपावली पोलिस वसाहतीतमध्ये क्वारंटाईन असलेले मोमीनपुèयातील ८, भानखेडामधील १, जुनी मंगळवारीतील १, इंदोरामधील १, नाईक तलाव- बांगला देश परिसरातील २, अशा तेराजणांचे नमुने मेयो प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आले.
मेडिकल रुग्णालयातून आज मोमीनपुरातील १० वर्षे व गड्डीगोदामधील १२ वर्षांच्या बरे झालेल्या कोरोनाबाधितांची सुटी झाली. आतापर्यंत एकूण ३८२ रुग्ण बरे झाले आहेत. मेडिकल रुग्णालयात ७६, मेयो रुग्णालयात ५९ व एम्स रुग्णालयात १४, असे एकूण १४९ प्रत्यक्ष बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान, बाधित आढळल्याने न्यू नंदनवन प्रभाग २७ मधील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार, साखरवाटे यांचे घर, वैद्य यांचे घर, नखाते यांचे घर व श्री गजानन धान्य भंडार या परिघातील परिसर प्रतिबंधित करण्यात आला. प्रभाग ३५ मधल्या नरेंद्रनगरातील अरqवद सोसायटीमधील पडलकर यांचे घर, जे.के. अपार्टमेंट, विजयानंद सोसायटीमधील येळणे यांचे घर, भोले यांचे घर या परिघातील परिसर प्रतिबंधित करण्यात आला.
दैनिक संशयित २५२
एकूण संशयित २३८७
एकूण पॉझिटिव्ह ५५९
डिस्चार्ज पॉझिटिव्ह ३८२
डिस्चार्ज संशयित २७५८
आज अलगिकरण केलेले संशयित २१९
अलगीकरणातून घरी पाठवले २२
अलगीकरणातून रुग्णालयात पाठवले ०६
सध्या अलगीकरण कक्षात १९२६
पाठपुरावा सुरू असलेले गृहविलगित ३१२
मृत्यू ११