'हा' क्रिकेटपटू लहान मुलांसाठी बनला देवदूत

    दिनांक :01-Jun-2020
|
केपटाऊन,
कोरोनाच्या संकटकाळात जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल ३५ हजार लहान मुलांवर उपासमारीची वेळ आली होती. या सर्व मुलांसाठी एक क्रिकेटपटू देवदूत ठरला आहे. या क्रिकेटपटूने लहान मुलांच्या फक्त भुकेचाच प्रश्न सोडवलेला नाही तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना नेमकी कशाची जास्त गरज आहे, हेदेखील त्याने जाणून घेतले आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे ठरवले. 
\
kids _1  H x W: 
 
 
दक्षिण आफ्रिकेचा फॅफ ड्यू प्लेसिस हा क्रिकेटपटू हा सध्या ३५ हजार उपाशी मुलांचे पोट भरत आहे. फॅफ पत्नी इमारी यांच्याबरोबर या ३५ हजार उपाशी मुलांसाठी धावून गेला असून त्यांची भूक शमवण्याचे पुण्याचे काम त्याने केले आहे. फॅफबरोबर रग्बी संघाचा कर्णधार सिया कोलीसी हा खेळाडूदेखील गरजू मुलांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. केपटाऊनमध्ये या दोघांनी मिळून प्रत्येक गरजूच्या घरी जाऊन त्यांनी मदत केल्याचे पाहायला मिळत आहे.
फॅफच्या या कामाला भारीतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने सलाम ठोकला आहे. रैनाने याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये रैना म्हणाला की, जी लहान मुले कोरोना व्हायरसच्या काळात संकटात आहेत त्यांना फॅफने मदत केली आहे. त्याच्या या कामाचे कौतुक करावे तेवढेच थोडे आहे. मी लोकांना आवाहन करतो की, त्यांनीही या पुण्याच्या कामासाठी पुढे यावे आणि मदत करावी. रैनाच्या या मेसेजबाबत फॅफने त्याचे आभार मानले आहेत.