हार्दिक-नताशाकडे ‘गोड’ बातमी

    दिनांक :01-Jun-2020
|
मुंबई,
भारताचा अष्ठपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने एक गोड बातमी दिली आहे. हार्दिक लवकरच बाप होणार आहे. ही गोड बातमी त्याने स्वत: सोशल मीडियावरून दिली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत ही गोड बातमी सांगितली आहे. या फोटोंपैकी एका फोटोमध्ये हार्दिकने घरच्या घरी लग्न केल्याचाही फोटो शेअर केला आहे, पण त्याबद्दल त्याने माहिती दिली नाही. हार्दिक पंड्याने नव वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्बियन मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकबरोबर साखरपुडा केला होता.
 
hardik-natasa_1 &nbs
 
विशेष म्हणजे हार्दिकने एक नव्हे तर दोन गोड बातम्या दिल्या आहेत. नताशा आई होणार असल्याचे जाहीर करताना त्याने विवाह केल्याचे देखील सांगितले. हार्दिकने इस्टाग्रामवर चार फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत तो नताशा सोबत दिसतो. तर दुसरा फोटो दोघांच्या लग्नाचा आहे. या फोटोत हार्दिक आणि नताशा विवाह केल्याचे दिसते.
 
सर्बियामध्ये जन्मलेल्या नताशाने वयाच्या तिसऱ्या वर्षी नृत्य शिकायला सुरुवात केली होती. १७ व्या वर्षी तिने मॉडर्न स्कूल ऑफ बॅलेमध्ये प्रवेश घेतला. २०१० मध्ये मिस स्पोर्ट्स सर्बियाचा पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनय आणि नृत्य यात करिअर करण्याचा निर्णय घेतला. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने २०१२मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. बिग बॉसच्या आठव्या पर्वातून तिला खरी ओळख मिळाली.