देशाचा पोशिंदा सक्षम असायला पाहिजे

    दिनांक :02-Jun-2020
|
आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन
सिरोंचा येथे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप
सिरोंचा,
देशाचा पोशिंदा शेतकरी असून खऱ्या अर्थाने शेतकरी सक्षम असायला पाहिजे असे मत आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले
ते सोमवार 1 जून रोजी मानव विकास मिशन कार्यक्रमा अंतर्गत महिला व पुरुष बचत गटांना अनुदानावर ट्रॅक्टरचे वाटप कार्यक्रमात मत व्यक्त केले.tractor_1  H xयावेळी प्रामुख्याने माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, रा.काँ.चे महिला जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शाहीन हकीम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, तालुका कृषी अधिकारी जगदीश दोंडे, उपसभापती कृष्णमूर्ती रीक्कुला, विजू रंगूवार,रा.काँ.चे तालुकाध्यक्ष मधुकर कल्लूरी, नगर सेवक सतीश भोगे, रवी रालबंडीवार, सत्यनारायण चिलकामारी, नागेश्वर गागापूरवार, विजय तोकला आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी मत व्यक्त करतांना म्हणाले की, मनुष्याला जगण्यासाठी अन्न लागते ते पिकविण्याचे महान काम शेतकरी करीत असतो त्यामुळे देशाचा पोशिंदा सक्षम व मजबूत असला पाहिजे व आधुनिक पद्धतीने शेती करायला पाहिजे यासाठी शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून अनुदानावर ट्रॅक्टर व सोबतच शेती कामांसाठी लागणारे अवजारे यांचे वितरण करीत असल्याचे बोलले.


यावेळी आ.धर्मराव बाबा आत्राम व भाग्यश्रीताई आत्राम यांनी सर्व प्रथम विधिवत पूजन व फित कापून बचत गटांच्या 10 ट्रॅक्टर लाभार्थ्यांना ट्रॅक्टरिचे चाव्या व अवजारे सुपूर्द केले. यावेळी महिला व पुरुष बचत गटाचे सदस्य व शेतकरी उपस्थित होते.