कर्म महात्म्य

    दिनांक :02-Jun-2020
|
"धनानि भूमौ पशवोश्च्य गोष्ठे भार्या गृहद्वारी जनस्मशाने। देहश्चितायां परलोक मार्गे कर्माणि गो गच्छतू जीव एक:।।
एक राजा असतो. त्याला स्वतःवर फार गर्व असतो. ईतका की तो आपल्या सेवकांना सांगतो अमुक अमुक दिवशी माझ मरण होईल तेव्हा मी मेल्यावर मी उभ्या आयुष्यात कमावलेला सगळा पैसा लत्ता माझ्या आजु बाजूला ठेवायचा. कालांतराने त्या राजाच मरण होत. त्याने सांगीतल्याप्रमाणे सगळ तसच्या तस केल्या जात. राजाला स्मशानघाटात अग्नि संस्कार होतो. व पुढील सगळे कार्य आटोपटतात. या वरील श्लोकातुन आपण काय बोध घेतला. तर त्यांना अस म्हणायचा आहे. धन,भूमि,पशु,पक्षी,प्राणी,गोठा, एवढच काय तर स्वतः ची पत्नी,उभ्या आयुष्यात कमवलेला पैसा,घरदार, स्मशाना पर्यंत सोडायला आलेला जनसागर कुठपर्यंत तर तोही तिथपर्यंतच. मग या सगळ्यात आपल्या सोबत काय जाणार आहे तर आपण उभ्या आयुष्यात केलेल कर्म,

nachiket kale_1 &nbs
वरील गोष्ट आमचे गुरुजी नेहमी सांगत असे. "कर्मयोगात असे म्हंटले आहे. वेदांत दर्शनातील ही एक अत्यंत उदार आणि उदात्त कल्पना आहे की, आपण भिन्न- भिन्न मार्गानी त्या एकाच अंतिम ध्येयाप्रत जाऊंन पोहोचु शकतो. हे मार्ग चार प्रकारचे आहेत.
ते कोण कोणते आहेत ते बघुया. १कर्ममार्ग, २ भक्तीमार्ग, ३योगमार्ग, ४ ज्ञानमार्ग. परंतू आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की हे सर्व ऐकमेकांपासून वेगळे नसून प्रत्येकाचाच इतरांत अंतर्भाव होत असतो. असे असणे कदापि शक्य नसते की एखाद्यान कर्म करण्याव्यतिरिक्त इतर कोणतीच शक्ती नसते ,किंवा भक्तीखेरीज आणखी काहीच नसते किंवा फक्त ज्ञानाखेरीज कशाचेच अस्तित्व नसते. अर्थात अंती हे चारही मार्ग आपल्याला एकाच ध्येयापर्यंत पोहचवून देत असतात.
या सर्व मार्गाचे अंतिम लक्ष्य 'मुक्ती' हेच असते. कर्मयोग ही नि:स्वार्थपरत व सत्कर्म यांच्या द्वारा मुक्तीलाभ करून घेण्याची एक विशिष्ट नैतिक आणि धार्मिक प्रणाली आहे.
कर्माचा कोणत्याही प्रकारच्या धर्ममतावर विश्वास असण्याची गरज नाही. कर्माचा ईश्वरावर सुद्धा विश्वास नसला तरीसुध्दा काहीच अडायचे नाही. तो आत्म्याचे अनुसंधान करो वा न करो, कोणत्याही प्रकारचे तात्विक चिंतन करो वा न करो, कशाचेच काही बिघडणार नाही.
कर्मासमोर नि:स्वार्थतेची प्राप्ती हे स्वतःचे असे विशिष्ट ध्येय असते. आता पुढचा प्रश्न असा आहे की, हे कर्म म्हणजे काय? कर्म हा शब्द संस्कृतातील ' कृ ' धातूपासून बनलेला आहे. 'कृ' म्हणजे करणे . जे काही केले जाते ते सारेच कर्म होय. मी लिहित आहे हेही एक कर्मच, आहे.तुम्ही वाचत आहात हे सुद्धा कर्मच,आपण श्वासोश्वास करतो हे देखिल कर्मच,शारीरिक किंवा मानसिक जेही काही आपण करतो ते सारे कर्मच, होय.
आपण कर्म करण्याचे अधिकारी आहोत पण त्या कर्माच्या फळाचे अधिकारी आपण नाही. कर्माचे फळ आपल्याला मिळाले पाहिजे या इच्छेने कर्म करू नये.
कर्म फळाचे चिंतन जर केले तर कर्माची गुणवत्ता कमी होईल. आणि आपण जो हेतू ठेवून कर्म करीत होतो तो साध्य होणार नाही. शिवाय कर्मफळाची वासना ठेवून कर्म केले तर तो जीवनात बंधने निर्माण करतील.
भक्तीचे आचरण करायचे परंतु त्यामुळे आपले नाव किंवा कीर्ती झाली की नाही इकडे लक्ष द्यायचे नाही हेच या जगात सर्वांपेक्षा कठीण कर्म, होय.
सभोवतालच्या लोकांच्या निंदास्तुतीची मुळीसुद्धा फिकर न करता अथवा तिकडे अजिबात लक्षच न देता अविरत सत्कार्य करीत जाणेच खरोखर सर्वश्रेष्ठ स्वार्थत्याग होय. कर्मावाचून कोणीही क्षणभरही राहू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या प्रकृतीधर्माप्रमाणे कर्म ही करावीच लागतात. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाच्या मागे कर्म ही लागलेलीच असतात. प्रकार बदलतात पण कर्म सोडणे शक्य नसते. "
एका राजाने एकदा त्याच्या राज्यातील शेतकऱ्यांना म्हंटले की, तुम्ही इतकं का राबता मी तुम्ही सर्वांना वर्षभर जेही धान्य लागत ते मी देत जाईल. सगळे शेतकरी मानले परंतु त्यातील एक शेतकरी असा तो म्हणाला नाही मला तुमची ही अट मान्य नाही. मी माझ्या जमीनीत पिकं लावणार जेही उत्पन्न होईल ते खाईल. एक वर्ष अस होत की त्या राज्यात पाऊस फार कमी होतो. आणि राजाला फार आनंद होतो की यंदा पाऊस कमी झाल्याने त्याची फजिती झाली असेल तो राजा निरोप पाठवून त्या शेतकरी माणसाला बोलावतो. तो म्हणतो खर आहे राजे यंदा पाऊस कमी झाला'मला मिळकत ही कमी अधिक मिळाली पण मी यात ही समाधानी आहे. निदान माझी सवय तरी कायम राहीली. या बाकीच्यांना तर फक्त आयत खाण्याची सवय झाली आहे. हे विचार आणि ही जिद्द बघून राजाने त्या शेतकऱ्याचा सत्कार केला. यातून त्या शेतकऱ्याच निष्काम कर्म अधोरेखित होत. कर्म न करणे यापेक्षा कर्म करते कधीही श्रेष्ठ होय.
शास्त्राने कर्माचे चार विचार सांगितले आहे. १ नित्यकर्म, २ नैमित्यिक कर्म, ३ काम्य कर्म, ४ निषिद्ध कर्म. १)नित्यकर्म म्हणजे काय तर दैनंदिन जीवनामध्ये पुरूषाने आपल्या ऑफिसची कामे करणे, तसेच आपल्या घरातील देवाची पूजा करणे, तसेच स्त्रिया सगळ्यांकरता रूचकर स्वयंपाक करतात.
घर जोडून ठेवतात आणि आपला स्त्री धर्म अगदी योग्य प्रकारे निभवतात हे नित्यकर्म होय.२)नैमित्यिक कर्म म्हणजे काय तर एखाद्या निमित्ताने केले जाणारे कर्म, आज या कोरोना काळात या निमित्त अनेक गरजूंना करत असलेली मदत,वाढ दिवसाच्या निमित्ताने केले जाणारे दानधर्म,आता येणाऱ्या चातुर्मासात केल्या जाणाऱ्या विशिष्ट पूजा, हे सर्व नैमित्यिक कर्मात येतात.३काम्य कर्म म्हणजे काय तर अमुक अमुक इच्छा धरून केलेल कर्म,जस की राजा दशरथाने केलेला पुत्रकामेष्टी यज्ञ,याची गणना काम्य कर्मात करण्यात येईल.४) निषिद्ध कर्म कशाला म्हणता येईल ते पाहूया. चोरी सारखे काम करणे खोट बोलणे म्हणजे जे कर्म शास्त्राच्या विरोधात जाऊन करतात.याला कुर्कम म्हणजेच निषिद्ध कर्म म्हणता येईल.
कलियुगात कर्माला अधिक महत्व आहे हे अधोरेखित करण्यासाठी आपल्या समोर नाथ परंपरेतील योगाभ्यानंद परमपूज्य श्री माधवनाथ महाराज,व परमपूज्य श्री व्यंकटनाथ महाराज यांच्या उपासनेत म्हंटली जाणारी एक प्रार्थना आहे.ती या ठिकाणी आवर्जून नमूद करावीशी वाटते.

कर्म, करतांना बुद्धी चांगली दे।कर्म करतांना देह पडू दे। कर्म करतांना पूजा तुझी होवो.निश्चयाचे बळ सदा अंगी राहो.।। माझी वाणी रंगूदे नित्य नामी ।तुझा माझा सहवास घडो स्वामी। नित्य घडूदे निष्काम विश्व सेवा हीच माझी प्रार्थना ऐक देवा.
बस या एका निश्चयाने आपले ध्येय ठरवत कर्म करत राहणे ईतकेच आपल्या हातात आहे.
ते करत आपले जीवन कृतार्थ करूया.
लेखक- वेदमूर्ती श्री नचिकेत काळे (गुरुजी)
मो-९०२८३३५२३५