पंचांग- ०२ जून २०२०

    दिनांक :02-Jun-2020
|


panchang_1  H x


ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर-२ जून २०२०
                                                               !!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक २ जून २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ १२ शके १९४२
🔴शुक्रास्त सुरू आहे
☀ सूर्योदय -०५:४०
☀ सूर्यास्त -१८:४२
🌞 चंद्रोदय - १५:२१
⭐ प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०१
⭐ सायं संध्या - १९:०३ ते २०:०८
⭐ अपराण्हकाळ - १३:४७ ते १६:२४
⭐ प्रदोषकाळ - १९:०३ ते २१:१५
⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५५
⭐ राहु काळ - १५:४८ ते १७:२६
⭐ श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी स.०९:४१ नं. शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२२ ते दु.१२:५९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी भात व पावटे खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦️ *लाभदायक *-->>
लाभ मुहूर्त-- १०:५५ ते १२:३३ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:३३ ते १४:११ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३३
पृथ्वीवर अग्निवास आहे🔥
शनि मुखात आहुती आहे.
शिववास ०९:४१ नं.कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी स.०९:४१ नं.शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर - शार्वरी
अयन - उत्तरायण
ऋतु - ग्रीष्म (सौर)
मास - ज्येष्ठ
पक्ष - शुक्ल
तिथी - एकादशी(०९:४१ प.नं.द्वादशी)
वार - मंगळवार
नक्षत्र - चित्रा (२१:१८ प.नं.स्वाती)
योग - व्यतिपात (०८:२५ प.नं.वरियान)
करण - भद्रा(०९:४१ प. नंतर बव)
चंद्र रास - कन्या(१०:०७ नं.तुळ)
सूर्य रास - वृषभ
गुरु रास - मकर
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - भद्रा ०९:४१ प., निर्जला एकादशी(उपवास)[या एकादशीस उपवास केल्यास १२ एकादशींच्या व्रताचे फळ मिळते], शर्करायुक्त जलकुंभ दान, द्विपुष्करयोग ०९:४१ ते २१:१८
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.
👉 "अं अंगारकाय नम:’’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीस गुळाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-मेष,वृषभ,सिंह,तुळ,धनु,मकर या राशिंना स.१०:०७ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.