यशराजच्या दोन अधिकार्‍यांची पाच तास चौकशी

    दिनांक :27-Jun-2020
|
- सुशांतिंसह राजपूत आत्महत्या प्रकरण
मुंबई, 
सुशांतिंसह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणामध्ये वांद्रे पोलिस अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी शुक‘वारी यशराज फिल्म्सच्या दोन माजी वरिष्ठ अधिकार्‍यांची चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशराज फिल्म्सचे माजी उपाध्यक्ष आशिषिंसह आणि यशराज फिल्म्ससोबत आधी काम करणार्‍या आशिष पाटील यांची चौकशी केली आहे. 2012 मध्ये सुशांतिंसह राजपूतसोबत करण्यात आलेल्या यशराज फिल्म्सच्या करारावर या दोघांच्याही स्वाक्षर्‍या होत्या.
 

Yash Raj Films_1 &nb 
 
आशिषिंसह यांची जवळपास पाच तास चौकशी करण्यात आली आणि यादरम्यान त्यांना कराराबाबत सविस्तर माहिती विचारण्यात आली. त्यांनी 2015पर्यंत सुशांत यशराज फिल्म्ससोबत असल्याचेही सांगितले आणि आपला जबाब नोंदवला, अशी माहिती सूत्रांनी दिली. वांद्रे पोलिसांनी आशिष पाटील यांनाही सुशांतसोबतच्या कराराबाबत प्रश्न विचारले. तसेच, सुशांतचे काम आणि यशराजच्या चित्रपटांतून बाहेर पडण्याबाबत चौकशी केली.
 
 
एका न्यूज पोर्टलने आशिषिंसह यांनी सुशांत यशराज फिल्म्समधून बाहेर पडण्याचे कारण विचारले होते, त्यावेळी त्यांनी मी यासंदर्भात काहीही सांगू शकत नाही, सगळी कारणे करारामध्ये दिलेली आहेत. परस्पर संमतीने यशराज फिल्म्समधून बाहेर पडल्यानंतरही ते सुशांतच्या संपर्कात होते, असेही त्यांनी सांगितले. आम्ही दोन चित्रपट एकत्र केले. काही प्रोजेक्ट, काही चित्रपट करणे शक्य झाले नाही. सुशांतने पाच वर्षांपूर्वीच यशराज फिल्म्स सोडले होते. तरीही आम्ही त्याच्या संपर्कात होतो. काहीच समस्या नव्हत्या, असे त्यांनी स्पष्ट केले.