सनरायजर्स हैदराबादसोबतची कारकीर्द निर्णायक

    दिनांक :27-Jun-2020
|
-भुवनेश्वर कुमारचे मत
नवी दिल्ली,
हाणामारीच्या षटकांमध्ये दडपण असताना गोलंदाजी कशी करायची, हे सनरायजर्स हैदराबाद संघाकडून शिकलो, असे भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सांगितले आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) संघ सनरायजर्स हैदराबादकडून खेळणे हे कारकीर्दीत निर्णायक वळण घेणारे होते, असे भुवनेश्वर म्हणाला.

bhuvneshwar kumar_1  
 
यॉर्कर चेंडू टाकणे हे सुरुवातीपासून मला चांगले जमते. मात्र अनेक वेळा अखेरच्या षटकांमध्ये त्या चेंडूंवर मोठे फटके खेळले जायचे. मात्र २०१४ मध्ये जेव्हा सनरायजर्स हैदराबाद संघाशी करारबद्ध झालो, तेव्हा सुरुवातीला कशी गोलंदाजी करायची आणि अखेरच्या षटकांमध्ये कसे चेंडू टाकायचे हे शिकलो. अखेरच्या षटकांमधील दडपण हाताळायला शिकलो, असे भुवनेश्वरने सांगितले.