विस्तारवादाला प्रत्युत्तर!

    दिनांक :28-Jun-2020
|
- हितेश शंकर
भारतातील वसाहतवादाच्या काळातील ब्रिटिश प्रशासक व कादंबरीकार कर्नल फिलिप मीडोज टेलर यांची ‘कन्फेशन्स ऑफ ठग’ ही एक अत्यंत गाजलेली कादंबरी आहे. यात त्यांनी, लोकांना जाळ्यात ओढणार्‍या बदमाशांचे किस्से सांगत, त्यांची कार्यप्रणाली, व्यूहरचना इत्यादींची सविस्तर माहिती दिली आहे. वरून शांत, हिंसक, मृदृभाषी दिसणार्‍या मुखवट्यामागे क्रूर, नृशंस चेहर्‍याची वास्तविकता शहारे आणणारी आहे. लोकांना लालूच, विवशता किंवा भाबडा भाव दाखवून हे ठक गोड-गोड गोष्टींचे जाळे अंथरतात. सहयोगाच्या नावावर जवळीक वाढवितात आणि एक दिवस संधी साधून काम तमाम करतात!
 

India China_1   
 
‘‘हिंदी -चिनी भाई भाई...’’ म्हणत माओने नेहरूंशी गोडगोड गोष्टीच तर केल्या होत्या! तिबेटच्या स्वातंत्र्याचा खून पडला, भारताची भूमी गेली आणि यानंतरही देशाला हेच समजावून सांगण्यात आले की, ‘‘त्या जमिनीचे काय करायचे? तिथे तर गवताचे पातेही उगवत नाही!’’ सरकार जागे झाले की झोपूनच राहिले, माहीत नाही; परंतु धोक्याच्या चाहुलीने मेजर शैतानिंसहसारख्या सुपुत्रांचे शौर्य मात्र जागृत झाले होते. यानंतर तर जणूकाही संपूर्ण भारतच जागा झाला. मुलामा उतरला की वास्तविकता चमकू लागते.
 
 
चिनी मनसुबे काय आहेत, हे भारत चांगले ओळखून आहे आणि म्हणून भारताच्या दृष्टीने चीनच्या दंगामस्तीऐवजी, भारताचे प्रत्युत्तर अधिक आश्चर्यचकित करणारे आहे. लडाखमध्ये भारत-चीनमधील झटापट ही काही पहिल्यांदाच घडलेली घटना नाही, परंतु सध्याच्या वास्तविक नियंत्रण रेषेला लागून भारतीय सीमावर्ती क्षेत्रात, भारतीय सैन्यासमोर अडून बसण्याच्या वारंवार घडलेल्या घटना आणि यावेळचा िंहसेचा स्तर सांगत आहे की, पेंगॉंग सरोवराच्या शांत पाण्यात अस्वस्थता व लालसेचे तरंग उठू लागले आहेत. ही अस्वस्थता आणि लालसा कुठल्या दिशेने आहे? याचे कारण काय? आणि याचा व्याप केवळ पेंगॉंग-त्सोपर्यंतच आहे का? तिबेटला बळकावल्यानंतर तिबेटच्या सीमेला लागून भारतीय भूभागात चीनची वाढलेली आसक्ती आणि हेकडपणा याच्या आरशात या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.
 
 
भारत आणि चीनमधील ‘शांत पट्‌टा’ (तिबेट) तत्कालीन भारतीय राजकारणाच्या डोळ्यांवर बांधलेल्या पट्‌टीमुळे गमवावा लागला, हे ऐतिहासिक तथ्य आहे. परंतु, याहूनही गंभीर बाब ही आहे की, या एका घटनेने भारताला तर धडा मिळालाच, सोबतच चीनच्या विस्तारवादी मनसुब्यांना ‘नखे व दात’देखील प्राप्त झाले.
 
 
तिबेट तुडवून, स्वतंत्र देश असलेल्या तायवानवर दावा ठोकत, ‘हिंदी -चिनी भाई भाई’चा नारा लावल्यानंतर मैत्रीच्या पाठीत सुरा खुपसणारा ड्रॅगन तेव्हापासून अधिकच उन्मत्त झाला आहे.
 
 
उन्मादाचे वैशिष्ट्य हे आहे की, प्रारंभी हा रोग पकडीत येत नाही. उन्माद वाढला की, सीमित परिघात उत्पात वाढतो. तरीही उपेक्षा अथवा प्रहसनाच्या भावनेने लोक त्याला टाळतात. परंतु एक क्षण असा येतो की, मर्यादेचे उल्लंघन होताच उत्पात करणार्‍याला झणझणीत प्रत्युत्तर मिळते. चीनसोबत लडाखमध्ये नेमके हेच झाले आहे. तायवानमध्येही हेच होत आहे. हॉंगकॉंगमध्ये हेच होणार आहे.
 
 
लडाख : संघर्षानंतर भारताच्या 20 बलिदानी सैनिकांचा आकडा समोर आला, परंतु चीन आपले नुकसान सांगू शकला नाही. लोकांनी तर पाहिले प्रेतांना वाहून नेणारे चिनी हेलिकॉप्टर... सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चिनी हेलिकॉप्टरला 46 फेर्‍या माराव्या लागल्या.
 
 
तायवान : चीनने ठरविले की, जागतिक मंचापर्यंत तायवानचा मुद्दा पोहचू नये. परंतु, 18-19 मे रोजी जागतिक आरोग्य संस्थेच्या मंचावर आणि 19 जूनला कोपनहेगन डेमॉक्रसी समीटमध्ये तायवानने दंड थोपटलेच.
 
 
तायवानचे चीनमध्ये सामील होणे अत्यावश्यक असल्याचे वारंवार सांगणार्‍या ड्रॅगनला तडाखेबंद उत्तर मिळाले की, या स्वतंत्र देशाला चीनचे ‘एक देश, दोन व्यवस्था’ हे ढोंग मंजूर नाही.
 
 
हॉंगकॉंग : चिनी सुरक्षा कायद्याच्या आड हॉंगकॉंगमधील लोकशाही स्वरांना दाबण्याचा प्रयत्न होताच, तरुणांसोबत 80-90 वर्षांचे वृद्धदेखील चीनच्या विरोधात पूर्ण ताकदीने येऊन उभे ठाकले. लडाखच्या घटनेचे संदर्भ-िंबदू जोडताना ही केवळ काही उदाहरणे आहेत. परंतु, ड्रॅगनचा उत्पात, उत्पाताला प्रत्युत्तर आणि या प्रत्युत्तरामुळे निर्माण झालेल्या चडफडाटाला दर्शविणारी उदाहरणे जागतिक स्तरावर भरपूर आहेत.
 
 
आज चीन कट-कारस्थानांचे जागतिक उदाहरण बनून जगासमोर उभा आहे. वरून सौम्य, गोडबोल्या, सहयोगी; परंतु संधी मिळताच जाळ्यात ओढणारा पुरेपूर उत्पाती... एका टोकाला चांदीचे नाणे बांधलेला ठकसेनाचा रेशमी रुमाल, सावजाच्या गळ्याला फास लावण्याचे उपकरण िंकवा त्याचा काळ कसा बनतो, हे कर्नल फिलिप यांनी आपल्या या कादंबरीत सांगितले आहे. चीनच्या रेशमी फासाची दमकोंडी जगाला अनुभवास येत आहे.
 
 
तसे पाहिले तर, लालसेशिवाय ठकसेन स्वत:च्या अस्वस्थतेतही गुरफटलेले असतात. आपसात फुटीची भीती, गोपनीय गोष्टी उघड होण्याची भीती िंकवा सावजाने बेसावधच राहण्याऐवजी सावध होणे, प्रतिकार होण्याचा धोका... एवढ्यातच चिनी कम्युनिस्ट पक्षात नेतृत्वाच्या प्रश्नावरून फुटीचे संकेत समोर येताना दिसत आहेत. समाजावर वामपंथी शासनाचा प्रभाव ओसरत आहे. जग चिनी चालबाजींवरून सावध होऊ लागले आहे.
 
 
ते असो. लडाखसारख्या झटक्यांना कसे उत्तर द्यायचे, ते आम्हाला चांगले माहीत आहे. परंतु, चीनसाठी आता जगात चहुबाजूंनी धोका आहे :
 
-निर्वासित सरकारच्या माध्यमातून तिबेटने घोषणा केली आहे की, लडाख त्याचा नाही, तर भारताचाच ऐतिहासिक भाग आहे.
-जागतिक व्यवस्थेत तायवान चीनपासून आपली स्वत:ची स्वतंत्र भागीदारी मागत आहे.
 
-व्हिएतनाम व तायवानला सोबत घेत अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपान एकजूट होत आहेत.
 
आणि भारत... तो तर आहेच. कारण, विश्वासघाताचा दंश झेलणार्‍या या भूमीने त्याचा अंतदेखील पाहिला आहे.
 
9868461676