इस्रायलकडून भारताला मिळणार सुरक्षाकवच!

    दिनांक :28-Jun-2020
|
जेरुसलेम,
चीनने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणावर आपल्या सैन्याची संख्या वाढवली आहे. भारतीय लष्करानेसुद्धा चीनच्या या आगळीकीला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे.
 
barak 8_1  H x
 
 
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी हवाई दलाची हालचाल पाहता भारताने स्वदेशी आकाश क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तैनात केली आहे. याचदरम्यान, भारताचा मित्र असलेल्या इस्रायलकडून एक मोठे सुरक्षा कवच मिळणार आहे. भारत इस्रायलकडून तातडीने ‘बराक-8 एलआरएस’ एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याची शक्यता आहे.
 
 
भारत-इस्रायलमध्ये नेव्ही व्हर्जन खरेदी करण्याबाबत वर्ष 2018 मध्ये एक करार करण्यात आला आहे. सध्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून सुरू असलेल्या हालचाली पाहता भारताने आता जमिनीवरून मारा करण्यात येणार्‍या एअर लॉंच व्हर्जन खरेदी करण्याबाबतची प्रक्रिया वेगवान केली आहे. इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजने (आयएआय) 2018 मध्ये सांगितले होते की, भारताने जवळपास 5687 कोटी रुपयांच्या ‘बराक-8’ क्षेपणास्त्र डिफेन्स सिस्टीमचा करार केला आहे.