टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी

    दिनांक :29-Jun-2020
|
-केंद्र सरकारचा ड्रॅगनला दणका
नवी दिल्ली, 29 जून
देशातील विदेशी चलन मोठ्या प्रमाणात नेणार्‍या आणि सुरक्षेच्या दृष्टीने घातक ठरू शकणार्‍या 59 चिनी अॅप्सवर केंद्र सरकारने आज सोमवारी रात्री बंदी घालण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. यात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टिकटॉकचा समावेश आहे.
 
 
Chinese Banned_1 &nb
 
चीनला धक्का देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून केंद्रात उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. आज बंदी घालण्यात आलेल्या चिनी अॅप्समध्ये टिकटॉकसोबतच शेअर इट, हॅलो, यूसी ब‘ाऊजर, लायकी आणि व्ही-चॅट या अॅपचाही समावेश आहे. या सर्व 59 अॅप्सवर बंदी घालणारा आदेश आदेश आज रात्री जारी करण्यात आला. हे सर्व अॅप्स देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेसाठी घातक ठरत असल्याचा निर्वाळा यावेळी देण्यात आला.
 
बंदी घालण्यात आलेल्या इतर अॅप्समध्ये बायडू मॅप, शीन, क्लॅश ऑफ िंकग, डीयू बॅटरी सेव्हर, हॅलो, लायकी, यू कॅम मेकअप, एमआय कम्युनिटी, सीएम ब‘ॉवर्स, व्हायरस क्लिनर, एपीयूएस ब‘ॉवर्स, रोमवूई, क्लब फॅक्टरी, न्यूज डॉग, ब्युट्री प्लस, वूई चॅट, यूसी न्यूज, क्यू क्यू मेल, वेईबो, झेंडर, क्यू क्यू म्युझिक, क्यू क्यू न्यूजफीड, बिगो लाईव्ह, सेल्फी सिटी, मेल मास्टर, पॅरलल स्पेस 31.एमआय व्हिडीओ कॉल-शाओमी, वुई िंसक, ईएस फाईल एक्सप्लोरर, विवा व्हिडीओ-क्यूयू व्हिडीओ इन्क, मेईतू, विगो व्हिडीओ, न्यू व्हिडीओ स्टेटस, डीयू रेकॉर्डऱ, व्हॉल्ट हाईड, केश क्लिनर डीयू अॅप स्टुडियो, डीयू क्लिनर, डीयू ब‘ॉऊजर, हॅगो प्ले विथ न्यू फ‘ेंड्‌स, कॅम स्कॅनर, क्लिन मास्टर चिता मोबाईल, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यू क्यू प्लेअर, वुई मीट, स्वीट सेल्फी, बायडू ट्रान्सलेट, वीमेट, क्यू क्यू इंटरनॅशनल, क्यू क्यू सिक्युरिटी सेंटर, क्यू क्यू लॉंचर, यू व्हिडीओ, व्ही फ्लाय स्टेटस व्हिडीओ, मोबाईल लिजेण्ड, डीयू प्रायव्हसीचा समावेश आहे.