अकोल्यात 26 रुग्णांची वाढ

    दिनांक :29-Jun-2020
|
बाधितांची एकूण संख्या झाली 1536   
अकोला, 
शहरात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असून आज 29 जून रोजी 26 बाधित वाढले आहेत व बाधितांची एकूण संख्या 1536 वर गेली आहे.आता तर बाजार सुरू झाला असल्याने नागरिकही मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागल्यानेही त्याचा प्रभाव बाधित वाढण्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे 357 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 331अहवाल नकारात्मक तर 26 अहवाल बाधितचे आले.आता अकोला जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 1536 झाली आहे.आज दिवसभरात 18 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आज अखेर 366 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 

akola 1_1  H x  
 
आज आढळले 26 बाधित 
आज दिवसभरात 26 जणांचे अहवाल बाधितचे आले. त्यात 12 महिला व 14 पुरुष यांचा समावेश आहे.यामध्ये 4 जण गजानन नगर, 4 जण कळंबेश्वर येथील, 3 जण गाडगेनगर, 3 जण हरिहर पेठ. 2 जण सिंधी कॅम्प, 3 जण दगडी पूल, अकोट फैल, अयोध्यानगर, डाबकीरोड, आदर्श कॉलनी, कामा प्लॉट व विठ्ठल मंदिर , तारफैल व अकोट येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
18 जणांना दिली सुटी
दरम्यान आज दिवसभरात 18 जणांना सुटी देण्यात आली. त्यात आठ जण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घरी सोडण्यात आले. त्यात 2 सिंधी कॅम्प, 2 अकोट फैल येथील तर उर्वरित हरिहरपेठ, गुलजारपुरा, जुने शहर व तारफैल येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
तर दहा जणांना कोविड केअर सेंटर मधून घरी सोडण्यात आले. त्यात 3 सिंधी कॅम्प, 2 शंकर नगर, 2अकोट फैल, बैदपुरा, लाडिज फैल, गायत्री नगर येथील रहिवासी आहेत.
366 बाधित रुग्णांवर उपचार सुरू 
आजपर्यंत एकूण 1536 बाधितांची संख्या आहे. त्यातील 77 जण (एक आत्महत्या व 76 कोरोनामुळे) मयत आहेत. तर सद्यस्थितीत 366 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.