नागपुरात कोरोनाचा आणखी एक बळी

    दिनांक :29-Jun-2020
|
 
मानकापुरातील एका बाधित महिलेचा मृत्यू
-मृत्यू संख्या २५,  ११८५ कोरोनामुक्त
नागपूर,

Another  Corona  victim d 
मानकापूर येथील एका बाधित महिलेचा सोमवारी मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाल्याने बाधितांच्या मृत्यूची संख्या २५ झाली. याशिवाय आज आणखी २५ बाधितांची भर पडली.
 
 
मानकापूरनिवासी ही ५४ वर्षांची महिला एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. तेथून तिला २० जूनला पहाटे २ वाजता मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले. रक्तदाब आणि मेंदूतील रक्तस्राव तिला होता. तिचा स्वॅब नमुना १९ जूनला पॉझिटिव्ह आला. तिच्यावर कोविड वार्डात उपचार सुरू होते. तिची प्रकृती खालावत गेली. श्वसनास अडथळा येत गेला. तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, आज सोमवारी दुपारी साडेबारा वाजता तिचा मृत्यू झाला. बाधितांच्या मृत्यूची संख्या एकूण २५ झाली आहे.
नीरी प्रयोगशाळेतून सोमवारी सायंकाळपर्यंत १०, एम्स प्रयोगशाळेतून ३, मेयो प्रयोगशाळेतून कामठी लष्करी रुग्णालयातील ६, दीपकनगर काटोल रोडवरील १, मनीषनगरातील १, मेडिकल प्रयोगशाळेतून १, असे एकूण २२ नमुने पॉझिटिव्ह आले. बाधितांची संख्या एकूण १४७२ झाली आहे.
दरम्यान, असे असले तरी आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित बरे झाले आहेत. मेडिकलमधून २६, मेयोतून १० व एम्समधून १, असे एकूण ३७ बरे झालेल्या बाधितांना आज सुटी देण्यात आली. आतापर्यंत एकूण ११८५ कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात मेडिकलमधील ५१२, मेयोमधील ५६०, एम्समधील ११३ तसेच कामठीच्या लष्करी रुग्णालयातील २ रुग्णांचा समावेश आहे.
अलगीकरणात १३३० संशयित असून अलगीकरणातून ९४ रुग्णांना घरी जाऊ देण्यात आले. १६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गृहविलगित असलेल्या २६३ संशयितांचा पाठपुरावा सुरू आहे.