कारवाईच्या नावाखाली गुटखा माफियांना अभय

    दिनांक :29-Jun-2020
|
 गुटखा माफिया नीलेश संगवई व वहीदखान यांचा गुटखा
अकोला,
अकोला शहरातील गुटखा माफियांवर पोलिस थातूर मातुर कारवाई करतात व त्यांना पुन्हा मोकाट सोडतात. नवे पोलिस अधीक्षक आले की याच लोकांवर कारवाई होते व त्यांना पुन्हा गुटख्यांचा अवैध उद्योग करण्यास मुभा दिल्या जात असल्याची चर्चा आहे. अकोल्यात जठारपेठ स्थित गुप्ते रोड निवासी नीलेश संगवई आणि बैदपुरा येथील वाहिदखान जागीरखान या दोघांचा सुमारे 37 लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह इतर चार गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पण, या अवैध व्यवसायावर नवे पोलिस अधीक्षक कायम उपाययोजना करतील काय असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने आज सकाळी ही कारवाई केली. तोेष्णीवाल लेआउट कडे शिवणी येथून महाकाली चौकात चार गाड्या येताना पोलिसांना आढळल्या. या गाड्यांच्या वाहनचालकांना विचारले असता त्यांनी सुगंधित पानमसाला व गुटखा असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात हा सर्व गुटखा प्रतिबंधित आहे. यात कालीबहार सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचे एकूण 17 कट्टे ,तसेच वाह सुगंधित पानमसाला सुगंधित तंबाखुचे 14 कट्टे , निळी बहारचे 4 कट्टे, विमल पानमसाला व सुगंधित तंबाखुचे 13 कट्टे, हॉट सुगंधित पानमसाला व तंबाखुचे 5 कट्टे, नजर 9000 चे 2 कट्टेे तसेव रजनीगंधा पान मसालाचे 4 बॉक्स असा एकूण 19 लाख 75 हजार रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखु मिळून आला.
 

akola news_1  H 
 
यात वापरण्यात आलेल्या चार मालवाहू गाड्या ज्यांची किंमत साडेसतरा लाख आहे. असा एकूण 37 लाख 25 हजारांचा मुद्दे माल पोलिसांना मिळाला. या प्रकरणात 9 आरोपी उघडकीस झाले आहेत. यात इमरान खान इरफान खान, शहाबाज मिया गुलाब बेग, तनवीर खान हसन खान, मजहर अली अयुब अली, अफजल खान फिरोज खान, आदिल खान फिरोज खान, सैयद उमेर सैयद मुस्ताक यांनी हा माल, वहीद खान जागीर खान रा.बैदपुरा हुमायु रोड व नीलेश संगवई गुप्ते रोड जठारपेठ यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला पण, यांच्या विरोधात कुठली नेमकी ठोस कारवाई केली याची माहिती दिली नाही. पोलिसांनी हा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त यांच्याकडे सुपूर्द केला अशी माहिती विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांनी सांगितली.
नव्या पोलिस अधीक्षकांनी ठोस कारवाई कारवाई करावी
जिल्ह्यात गुटखा माफियांचे मोठे जाळे असून यावर ठोस कारवाई करण्याची गरज आहे. त्याच बरोबर या प्रकरणात अवैध गुटखा विक्रेत्यांचे वित्तपुरवठादार यांचा शोध घेण्याची गरज असून रेल्वे स्टेशन चौकातून हा व्यवसाय वृद्धिंगत होत असल्याची माहिती समोर आली आहे. या वित्तपुरवठादारांवर देखील कारवाईची गरज आहे. गुटखा विक्रेत्यांवर कायम स्वरुपी कारवाईची गरज असून त्या दृष्टीने नवे पोलिस अधीक्षक काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.