हुमाला वीज बिलाचा झटका...

    दिनांक :29-Jun-2020
|
वाढीव वीज बिलाचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रेटींनाही बसत असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्री तापसी पन्नू आणि रेणुका शहाणे यांच्या पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीला वीज बिलाचा फटका बसला आहे. या अभिनेत्रीने ट्विट करत वीज बिलाची माहिती दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे हुमा कुरैशी आहे.
 
 
Huma Qureshi_1  
नुकताच हुमाने ट्विट करत वीज बिलाची माहिती दिली आहे. ‘गेल्या महिन्यात मी सहा हजार रुपये वीज बिल भरले आणि आता या महिन्यात मला ५० हजार रुपये बिल?’ असे हुमाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी अभिनेत्री तापसी पन्नूला तब्बल ३६ हजारांची वीज बिल आल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. तर अभिनेत्री रेणुका शहाणे यांना २९,७०० रुपये आले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वीज बिलाची जोरदार चर्चा सुरु आहे.
 
 

बिले का वाढली?
टाळेबंदीच्या काळात वाढलेला वीजवापर आणि एप्रिलपासून वाढलेले वीजदर यामुळे वीज देयकांत लक्षणीय वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. त्याचप्रमाणे आधीच्या दोन महिन्यांतील सरासरी आणि प्रत्यक्ष वीजवापर यांच्यातील फरकाची रक्कमही देयकांत जोडण्यात आल्याने नागरिकांवर भार वाढल्याचे तज्ज्ञ सांगतात.