पेट्रोल डिझेलच्या किंमतीत आज पुन्हा वाढ

    दिनांक :29-Jun-2020
|
नवी दिल्ली, 
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज पुन्हा एकदा वाढ झाली.  ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी राजधानी दिल्लीत सरकारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 पैशांची वाढ केली आहे. तर डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर 13 पैशांची वाढ करण्यात आली आहे.  तर, एक लिटर डिझेलची किंमत 80.53 रुपये असणार आहे. खरंतर, रविवारी तेलाच्या किंमतीत सतत होणारी वाढ थांबली होती. पण पुन्हा किंमती वाढल्या आहेत.


petrol _1  H x
देशाच्या प्रमुख शहरात इंधनाच्या किंमती 
 
कोलकाता- पेट्रोल 82.10 रुपये     डिझल 75.64 रुपये लिटर.
मुंबई- पेट्रोलचे दर 87.19 रुपये     डिझल 78.83 रुपये लिटर आहे.
चेन्नई- पेट्रोल 83.63 रुपये             डिझलचे दर 77.72 रुपये लिटर आहे.