अमरावतीत कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ

    दिनांक :29-Jun-2020
|
28 नवे रुग्ण, 130 कोरोना क्रियाशील
अमरावती, 
अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्या आता वेगाने वाढायला लागली आहे. रविवारी रात्री व सोमवारी एकूण 28 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 7 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. शहरातल्या नवीन भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे.
 
 
corona news _1  
 
 
जिल्ह्यात आतापर्यंत 549 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून प्रत्येक्षात 130 रुग्णच कोरोना क्रियाशील आहे. त्यापैकी 9 रुग्णांना नागपूरात हलविण्यात आले आहे. आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 396 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी रविवारी उशिरा रात्री आणि सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, वलगाव विलगिकरण कक्षातील 16 वर्षीय युवक, अंजनगाव सुर्जी गुलजार पुरा येथील 36 वर्षीय पुरुष, मोमीनपुरा येथील 33 पुरुष, परतवाडा सायमा कॉलनी येथील 50 वर्षीय पुरुष, अंजनगाव सुर्जी डब्बीपुरा येथील 33 पुरुष, अंजनगाव सुर्जी काझीपुरा येथील 32 वर्षीय पुरुष, अमरावती मधुबन ले-आउट येथील 27 वर्षीय पुरुष, मध्यवर्ती कारागृह येथील 32 वर्षीय पुरुष, पीडीएमसी रुग्णालयातील 50 वर्षीय परिचर, पाचबंगला बडनेरा येथील 70 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय महिला व 54 वर्षीय पुरूष, अशोकनगर अमरावती येथील 25 , 19 वर्षीय युवती, 26 व 28 वर्षीय पुरुष, 45 व 40 वर्षीय महिला व 28 वर्षीय, नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालय येथील 38 वर्षीय पुरुष, हिवरा धारणी जि. यवतमाळ येथील 22 वर्षीय युवती, महात्मा फुले नगर नवसारी येथील 18 वर्षीय युवती, यशोदानगर येथील 27 वर्षीय महिलेचा आणि अमरावतीच्या झमझमनगर येथील 82 वर्षीय महिला, धामणगाव रेल्वे येथील 75 वर्षीय पुरूष, जुनीवस्ती बडनेरा येथील 65 वर्षीय महिला, कृष्णानगर येथील 55 वर्षीय पुरूष, अंबागेट येथील 55 वर्षीय पुरूष, योगिराज नगर येथील 50 वर्षीय पुरूषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या नवीन रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
308 प्रलंबित, 200 नवीन पाठविले
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सोमवारी कारोना तपासणी अहवालाचा तपशिल प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 20 हजार 599 नागरिकांची तपासणी झाली आहे. तसेच आजपर्यंत 9 हजार 219 जणांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविले, त्यापैकी 8 हजार 215 जणांचे अहवाल निगेटिव्ह व 547 जणांचे पॉझिटिव्ह आले आहे. सध्या 308 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. 149 नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 200 नवीन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे, असे प्रशासनाने कळविले आहे.