मुंबई हल्ल्यातील साजिद मिरचा चार देशांमध्ये हल्ल्याचा कट

    दिनांक :29-Jun-2020
|
- फ्रान्स, ऑस्ट्रेलियन गुप्तचरांंच्या तपासात खुलासा
 
 पॅरिस, 
मुंबई हल्ल्यातील तोयबाचा अतिरेकी साजिद मिर आता या संघटनेच्या दहशतवादी कारवायांचा विस्तार करीत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया, व्हर्जिनिया, अमेरिका आणि फ्रान्सवर हल्ला करण्याचा कट रचल्याची खळबळजनक माहिती समोर आली. पाच वर्षांपूर्वी फ्रान्समधील नागरिक विली ब्रिगेटी याच्या चौकशीवेळी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रिगिटी हा साजिद मिरचा विश्वासू हस्तक आहे. 2001 मध्ये विदेशातील कारवायांची जबाबदारी सांभाळताना साजिदने त्याला शोधले होते. फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सच्या गुप्तचर यंत्रणांनी बिली आणि पाकिस्तानी वंशाचा आर्किटेक्ट फहीम खालिद लोधी यांना ऑक्टोबर 2003 मध्ये अटक करून बॉम्बहल्ल्याचा कट उधळला होता.

sajid mir_1  H
बिलीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. विदेशात अतिरेकी भरतीसाठी तोयबाने मिरची निवड केली. त्याचे वास्तव्य सध्या लाहोरचा बाह्यभाग मुरिडके येथ आहे. साजिदने अफगाणिस्तानातील अल्‌ कायदासोबत संधान साधले आहे. तोयबाचा मिलिट्री प्रमुख झाकी-उर-रहमान लखवीची तो विनापरवानगी भेट घेऊ शकतो. पाकिस्तानी प्रशासनाने लखवीला संरक्षण दिले आहे, अशी माहिती त्याने दिली.
साजिद मिर हा लखवीचा विश्वासू हस्तक आहे. लखवीच्या संरक्षणाची जबाबदारी देखील त्यावरच आहे. क्रिकेट सामन्यांचा दर्शक म्हणून साजिद मिरने एप्रिल 2005 मध्ये भारतात प्रवेश केला होता. त्याने डेहराडून येथील लष्कर अकादमी आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाची रेकी त्यावेळी केली होती, अशी माहिती फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणांच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.
फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणांनी साजिद मिरबाबत माहिती मिळवली. त्यानंतर मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्याची स्पष्ट माहिती अमेरिकेने मिळवली. मुंबईतील छाबड हाऊसमध्ये होल्ट्‌झबर्ग दाम्पत्याच्या डोक्यात गोळ्या घालण्याचे आदेश त्यानेच दिले होते.