प्लाझ्मा चाचणीस आता गती येणार

    दिनांक :29-Jun-2020
|
नागपूर,
 
 
जगातल्या सर्वात मोठे प्लाझ्मा थेरपी टड्ढायल केंद्र, असा गौरवपूर्ण उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी केल्याने मेडिकल रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांसह सर्वांना हुरूप आला. प्रत्यक्षात कोरोनाबाधितांमध्ये प्लाझ्मा उपचार पद्धतीचा प्रारंभ नागपुरात या महिन्याच्या प्रारंभीच झाला होता. लवकरच त्यास गती येणार आहे.
 
 

plasma  tests_1 &nbs 
नागपुरातील मेडिकल रुग्णालयात प्लाटिना प्रोजेक्ट प्लाझ्मा थेरपी टड्ढायल केंद्राचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बँक, प्लाझ्मा टड्ढायल आणि इमर्जन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचेही उद्घाटन झाले.
नागपुरातील मेडिकल रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उप अधिष्ठाता डॉ. कुंभलकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, औषदेविज्ञानविभाग प्रमुख डॉ. राजेश गोसावी, तसेच डॉ. नरेश तिरपुडे, डॉ. अqनद्य मुखर्जी आणि इतर डॉक्टर्स आणि विभागप्रमुख एपीआय सभागृहात उपस्थित होते. डॉ. सजल मित्रा यांनी आभार मानले.
 
 
मेडिकलमधील रक्तपेढीत हे प्लाटिना प्रोजेक्ट प्लाझ्मा थेरपी टड्ढायल केंद्र साकारले जात असून प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बँक, प्लाझ्मा टड्ढायल आणि इमर्जन्सी ऑथराजेशन या चार सुविधा तेथेच उपलब्ध राहतील. नागपुरात ही चाचणी जून महिन्याच्या प्रारंभीच सुरू झाली. एका कोरोनामुक्त रुग्णाने ६ जूनला त्याच्या रक्तातील प्लाझ्मा दान केला. एका खाजगी रक्तपेढीत मेडिकल रुग्णालयाचे औषधीविज्ञान विभाग प्रमुख डॉ. राजेश गोसावी, डॉ. संजय पराते, अतिविशेषोपचार रुग्णालयातील श्वसनरोग विभाग प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम आदींच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली. याच चमूच्या देखरेखीखाली मेडिकलमध्ये प्लाझ्मा चाचणी केली जात आहे.