हिंदुत्वाला चिंतीत करणारे तीन मुद्दे

    दिनांक :26-Jul-2020
|
भारताची ओळख तसेच भारताच्या अखंडतेशी जुळल्या असल्यामुळे राममंदिराचे बांधकाम, गोवंश रक्षण आणि भारतीय संविधानातील कलम 370 हटविणे या मुद्यांबाबत हिंदूत्वाला विशेष  चिंता  आहे.
 

ayodhya_1  H x
 
रामजन्मभूमी मंदिर
जेव्हा केव्हा आम्ही उच्च आदर्श आणि सद्गुणांचा विचार करतो, आमच्या मनात प्रभू रामचंद्राची प्रतिमा उभी राहते. जगात जे काही शुभ आणि उदात्त आहे, ते म्हणजे प्रभू रामचंद्र! ‘भारत म्हणजे रामाची भूमी’ अशी घोषणा जनसामान्यांत वारंवार होत असते. प्रभू रामाचे अयोध्येतील त्याच्या जन्मस्थानावरचे मंदिर आक्रमक मोगल फौजांनी भ्रष्ट केले. पुरातत्त्व शास्त्राने हे सिद्ध केले आहे. म्हणून, अयोध्येतील त्याच्या जन्मस्थानी रामाचे एक भव्य मंदिर असणे सर्वोपरी महत्त्वाचे आहे. प्रभू रामाचे शुद्ध चारित्र्य, त्याचे अनेक गुण जसे- प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राथमिकता देणे, महिलांबाबतचा आदर प्रस्थापित करणे, त्याचे अतुलनीय शौर्य, त्याचे धर्मरक्षण आणि एक राजा, शिष्य, बंधू, पुत्र, पती आणि मित्र म्हणून त्याचे आदर्श आचरण, भारतात पिढ्यान्‌पिढ्या संक्रमित झालेल्या मूल्यांची आधारशिला आहे. म्हणून राम हे हिंदूत्वाचे सर्वश्रेष्ठ प्रतीक आहे.
 
 
भारताचे पुनरुत्थान आणि श्रीरामजन्मस्थानावर राममंदिराची उभारणी, राष्ट्रीय सांस्कृतिक आकांक्षेला अभिव्यक्त करत असल्यामुळे ते हिंदूत्वाच्या चळवळीचे महत्त्वाचे टप्पे आहेत. श्रीरामजन्मस्थानावर राममंदिर उभारणे रा. स्व. संघाचा संकल्प आहे.
 
 
संघाने अनेक वेळा जाहीरपणे सांगितले आहे की, भारतातील मुसलमानांचे पूर्वजदेखील प्रभू रामाच्या वंशावळीतीलच आहेत. ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. इतिहासाची स्मृती लोप पावल्यामुळे ते या वंशावळीपासून स्वत:ला विभक्त समजत आहेत. श्रीरामजन्मभूमीचा मुद्दा अनेक वेळा प्रतिनिधी सभा तसेच कार्यकारी मंडळाच्या बैठकीत चर्चिला गेला आहे. प्रभू रामाच्या जन्मस्थानी भव्य राममंदिर बांधण्याची सर्वसामान्य लोकांची इच्छा, विविध ठरावांमध्ये अभिव्यक्त झाली आहे.
 
गोवंश संरक्षण
गोवंश संरक्षण ही काही नवी संकल्पना नाही. निसर्गपूजनाचे ते प्रतीक आणि भारतीय मानसिकतेचे अभिन्न अंग आहे. लोकसाहित्यातही गाईला माता म्हणून पूजनीय मानले आहे आणि ती ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार आहे. ग्रामीण भारतात, सामान्य व्यक्तीच्या दृष्टीने वेळदेखील गाईशी संबंधित असते; म्हणजे संध्याकाळी गाई चरून घरी परततात, त्या वेळेला ‘गोधुली’ हा शब्द वापरला जातो. भारताच्या संविधानानेदेखील गाईच्या या महत्त्वाला व भारतीय मन-मस्तिष्कातील तिच्या पावित्र्याला ओळखले आहे. राज्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे कलम 48, गोहत्येला मनाई करते. ही मार्गदर्शक तत्त्वे सरकारने कायदा करण्यासाठी दिशादर्शक आहेत आणि बर्‍याच भारतीय राज्य सरकारांनी तसेच केंद्रशासित प्रदेशांनी गोसंरक्षणासाठी कायदे केले आहेत. गोरक्षणाला रा. स्व. संघाचे समर्थन सर्वश्रुतच आहे. या विषयावर अ. भा. प्रतिनिधी सभा आणि कार्यकारी मंडळाचे अनेक ठराव आहेत. सध्या, जवळपास 20 राज्यांनी गोरक्षणासाठी कायदे केले आहेत. यात राजस्थान, आंध्रप्रदेश, तेलंगणा, आसाम, बिहार, छत्तीसगड, चंदीगड, दिल्ली, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश यांचा समावेश आहे. हे कायदे प्रदीर्घ संघर्ष आणि लोकनिर्वाचित प्रतिनिधींपर्यंत जनजागृती पोहचविल्याचा परिणाम आहे.
 
 
गुरुजींनी असेही म्हटले आहे की, देशाच्या काही भागात गोमांस भक्षण करणारे काही समाज असतील, तर त्यांनी यापासून परावृत्त व्हावे म्हणून त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. असे असले तरी, जे गोहत्येत सहभागी आहेत आणि जे गोमांस भक्षण हा राजकारणाचा एक भाग समजतात त्यांचा विरोध होणे गरजेचे आहे. गोतस्करी हा सुनियोजित गुन्हा आहे. तो गोतस्करीपासून सुरू होतो आणि नंतर गोहत्येत जाऊन थांबतो. पशुधन शेतकर्‍यांची जीवनरेखा आहे. गोधन ही केवळ संपत्ती नाही, तर शेतकर्‍यांचे त्यांच्याशी भावनात्मक नातेही असते. म्हणून, शेतकर्‍यांनी गोरक्षणासाठी स्वत: संघटित होणे तसेच गोतस्करांविरुद्ध दक्षता पथके तयार करणे आवश्यक आहे. भारतीय समाजात गाई व पशूंचे प्रेम खोलवर रुजले आहे. हे प्रेम केवळ धार्मिक नाही, तर ते सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांशीही जुळले आहे.
 
 
आपल्या स्थापनेपासूनच विश्व हिंदू  परिषद  (विहिंप ) गोरक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असली, तरी 1986 साली श्रीमंत विजयाराजे िंशदे यांच्या मार्गदर्शनाखाली वििंहपमध्ये एक औपचारिक विभाग स्थापन करण्यात आला.
 
 
सेमिनार, परिषदा आणि गोरक्षणाबाबत जागृती होण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यासाठी 1996 साली गो-विज्ञान अनुसंधान केंद्राची स्थापना करण्यात आली. हे केंद्र पंचगव्याचाही (गोमय, गोदुग्ध, ताक, दही व तूप) प्रचार करीत असते. तसेच पंचगव्य चिकित्सादेखील उपलब्ध करीत असते.
 
 
औषधी उत्पादने आणि सेंद्रिय खत तयार करण्यासाठी गोमूत्र व गोमय गोळा करून शेतकर्‍यांनी भाकड गाईंपासूनदेखील उत्पन्न कसे मिळवावे, यासाठी संघप्रेरित अनेक संस्था काम करीत आहेत. अन्न नैसर्गिक असावे, रसायनयुक्त नसावे या भावनेशी ताळमेळ बसवून नैसर्गिक शेतीच्या प्रचार-प्रसारासाठी संघाच्या ग्रामविकास योजनेने शेतकर्‍यांना सक्रिय सहभागी करून घेतले आहे.
 
संस्कृतचे राजनीतीकरण
आपल्या देशात संघर्ष उत्पन्न व्हावा म्हणून भाषांचे राजनीतीकरण करण्यात आले. वास्तवात, सर्व भारतीय भाषांची जननी असलेल्या आणि भारतातील भाषांचे मूळ ज्या संस्कृत भाषेत आहे, तिला जाणूनबुजून सार्वजनिक संभाषणातून आणि शैक्षिक साहित्यांतून बाजूला सारण्यात आले. सर्व भर समान स्रोतावर नव्हता, तर विभाजनात, पृथकत्वात होता. भाषा ही मानवी बुद्धीचे सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण, तसेच संवादाचे शक्तिशाली माध्यम आहे. उदाहरणार्थ, समय हा शब्द संस्कृत मूळ भाषा असल्यामुळे बंगाली, िंहदी, मराठी इत्यादी भाषांमध्ये समान आहे. संस्कृत ही संपर्क भाषा आहे. जोडणारी भाषा आहे. मंदिरांमधील प्रार्थना- मग त्या केरळच्या गुरुवायूर मंदिरातील असो वा आसामातील कामाख्या मंदिरातील असो, संस्कृत भाषेतल्याच असतात. लोकांना जेव्हा ही संलग्नता लक्षात येईल तेव्हाच ते त्यांच्या भाषेहून दुसरी भारतीय भाषा शिकण्यास प्रेरित होतील आणि भाषिक सामंजस्याचा मार्ग प्रशस्त होईल. जर ही संलग्नता लोकांसमोर मांडली नाही, तर भाषिक भेदभावाचे विपरीत सामाजिक परिणाम दिसू लागतील.
 
 
रा. स्व. संघ संस्कृत भाषेला ऐक्य स्थापन करणारे, परस्परांना जोडणारे एक महान तत्त्व, तसेच विशाल वारशाचा एक घटक मानतो. इथे कुठल्याही प्रकारची उतरंड नाही. सर्व भारतीय भाषांचे त्यांचे स्वत:चे साहित्य, तत्त्वज्ञान, व्याकरण आणि रचनाक्रम आहे. एवढेच नाही, तर संस्कृतसोबतच या सर्व भाषादेखील एका कुटुंबातील आणि भारतीय ज्ञानपरंपरेच्या भीमकाय स्तंभासारख्या आहेत.
 
 
असे असूनही संस्कृत शिकविण्यावरून निर्लज्ज राजकारण करण्यात येत आहे. 1994 साली दिलेल्या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने, संस्कृत शिकविणे सेक्युलॅरिझमच्या विरुद्ध असल्याचा आरोप फेटाळून लावला. न्यायालय म्हणते- ‘हे खरे आहे की, संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्याची आमच्या संविधानातील अनुच्छेद 351 नुसार गरज आहे. अनुच्छेद 351 मध्ये नमूद आहे की,  हिंदी भाषेच्या प्रसारास चालना देणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात आणता येईल अशा रीतीने तिचा विकास करणे, तिच्या प्रकृतीला धक्का न लावता, िंहदुस्थानी व आठव्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्या अन्य भारतीय भाषा यांमध्ये वापरली जाणारी रूपे, शैली व शब्दप्रयोग सामावून घेऊन आणि जेथे जेथे आवश्यक वा इष्ट असेल तेथे तेथे तिच्या शब्दसंग्रहाकरता मुख्यत: संस्कृतचा वा गौणत: अन्य भाषांचा अवलंब करून तिची समृद्धी साधणे हे संघ राज्याचे कर्तव्य असेल.’ संस्कृतच्या संमिश्रणाने स्वत:ला अतिशय समृद्ध केलेल्या इतर सर्व भारतीय भाषांच्या बाबतीतही हे लागू आहे.
 
 
संस्कृत भारताची संस्कृती व सभ्यता दोन्हीही आहे. अरिंवदांपासून ते आंबडेकरांपर्यंत भारताच्या नेत्यांनी तिला भारताची प्रतिभा मानली आहे. विल ड्युरँट ते अर्थर शोपेनहॉवरपर्यंत पाश्चात्त्य इतिहासकार, भाषाविद् आणि शास्त्रज्ञांना तिच्या ज्ञानाने, पांडित्याने आश्चर्यचकित केले आहे. संस्कृतमधील हे ज्ञान पाश्चात्त्य जगताला धक्कादायक असेल आणि त्यांच्या समजुतीत आणि विचारांत बदल घडवून आणू शकेल.
 
भारताला विश्वगुरू बनवायचे असेल, तर संस्कृत तसेच सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे संघ मानतो. संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी संस्कृत भारती हे सामाजिक संघटन कार्यरत आहे. अध्यापन व माहितीचा प्रसार यामधील संस्कृत भाषेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिकेला पूर्णत्वास नेण्यास ही संघटना प्रयत्नशील आहे. ही संस्था अल्पमुदतीचे अभ्यासक्रम चालविते तसेच अमेरिकेतही तिचे उपक्रम चालतात. या उपक्रमांचे कॅलिफोर्निया येथे मुख्यालय आहे. ब्रिटनमधील शाळांमध्ये संस्कृतचे फार आकर्षण आहे. लंडनच्या सेंट जेम्स ज्युनिअर शाळेत संस्कृत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय रीतीने वाढली आहे. जगभरातील भाषातज्ज्ञ म्हणतात की, संस्कृत भाषिक विकासाला व स्वरशास्त्राला उत्तेजित करते. जर्मनीत 14 श्रेष्ठ विद्यापीठांमधून संस्कृत शिकविले जाते. स्वित्झर्लंड व इटलीत ‘स्पोकन संस्कृत’च्या उन्हाळी शाळांमध्ये प्रवेश घेणार्‍यांची प्रचंड गर्दी होत असते.
 
संस्कृत शिक्षकांची फार मागणी आहे. ज्यांना संस्कृत शिकता आले नाही ते, आपली संधी हुकली म्हणून चुकचुकत असतात. भारताचे माजी सरन्यायाधीश मनेपल्ली नारायणराव व्यंकटचलैया आणि रमेशचंद्र लाहोटी, पंजाब उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रामा जॉईस आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांसारख्या प्रख्यात व्यक्ती, संस्कृत विद्वानांच्या मदतीने संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसारात आपले योगदान देत आहेत. जागतिक संस्कृत पुस्तकमेळ्याने अनेक तरुणांना आकर्षित केले आणि त्यांच्यात भारताच्या बौद्धिक संपदेबाबत संशोधकवृत्ती जागृत केली. समाजातील वैज्ञानिकांच्या गटांनादेखील ही भाषा खुणावत आहे. ‘संगणकासाठी संस्कृत भाषा हीच केवळ एकमेव उपयुक्त नैसर्गिक भाषा म्हणून समजली गेली आहे. भारतीय भाषांच्या यांत्रिक अनुवादासाठी जे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे, त्यात माध्यम-भाषा म्हणून संस्कृत वापरण्यात आली आहे.’ असे मत माजी सरन्यायाधीश रमेशचंद्र लाहोटी यांनी व्यक्त केले आहे. म्हणूनच, संस्कृत अध्ययन-अध्यापनाबाबत संघाचा दृष्टिकोन देशात तसेच जगभरातही स्वीकारला जात आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी अखिल भारतीय संघटन मंत्री व रा. स्व. संघाचे विद्यमान अखिल भारतीय सह प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी लिहिलेल्या ‘द आरएसएस रोडमॅप्स फॉर द ट्‌वेन्टीफर्स्ट सेंचुरी’ या पुस्तकाचा क्रमश: भावानुवाद