वनविभागापुढे वाघांच्या अधिवास संरक्षणाचे आव्हान!

    दिनांक :28-Jul-2020
|
- राज्यातील सर्वाधिक वाघ विदर्भात
- जागतिक व्याघ्र दिवस विशेष
 
निखिल केळापुरे 
नागपूर,
वाघांची राजधानी म्हणून विदर्भाचे नाव संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाचे हमखास दर्शन होते, अशी वेगळी ओळख जागतिक स्तरावर आहे. शासन वाघांच्या संरक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. त्यामुळे वाघांच्या संख्येत झालेली वाढ लक्षणीय असून, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.
 

tiger_1  H x W: 
 
व्याघ्र पर्यटनाच्या माध्यमातून वनविभाग मोठ्या प्रमाणात महसूल देखील कमवित आहे. परंतु वाघांच्या संख्येत वाढ झाली असली तरी त्याच्या अधिवासाच्या संरक्षणाचा प्रश्न तसेच मानव- व्याघ्र संघर्ष याचेही प्रमाण वाढले असून, येणाèया काळात वाघांचा अधिवास वाचविणे आणि मानव-वाघ संघर्ष कमी करणे ही वनविभागापुढे आव्हाने ठरणार आहेत.
 
काही वर्षांपूर्वी देशात वाघांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. मात्र शासन, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नातून वाघांची संख्या प्रचंड वाढली असल्याचे दिसून येते. २०१८ च्या व्याघ्र गणनेनुसार देशात २ हजार ९६७ वाघ असून, राज्यात ३१२ च्या जवळपास वाघ असल्याचे अहवाल सांगतो. वाघांची संख्या तर वाढली, मात्र त्यांचा अधिवास हळूहळू कमी होत चालला आहे. मागील काही महिन्यात मुक्तसंचार करणाèया सुमारे पाच वाघांना विविध क्षेत्रातून qपजèयात डांबण्यात आले.
 
पूर्वी मानवी वस्तीपासून जंगल क्षेत्र फार दूर असायचे. एवढेच नाही तर शेतजमिनीचा थोडा परिसर सोडला तर जंगलात वास्तव्यास असणारे वाघ सहजासहजी गावात शिरत नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे वाघांना मिळणारे पोषक वातावरण जंगलात होते. मात्र आता जंगलात होणारी विकास कामे आणि शेतजमिनीच्या माध्यमातून होणारे अतिक्रमण या सर्व प्रकारांमुळे वाघांचा अधिवास दिवसेंदिवस कमी होत आहे. एवढेच नाही तर आवश्यक खाद्य जंगलात उपलब्ध नसल्याने वाघ गावाकडे येत आहेत. वेळप्रसंगी गावांमध्येही वाघ शिरत असल्याची प्रकरणे अलीकडे वाढली आहेत.
 
वाघ शेतात येऊ नये यासाठी शेतकरी शेतकुंपणात विद्युत प्रवाह देखील सोडत आहेत. यामुळे बरेच वाघ मृत्युमुखी पडत आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास कधी वाघाच्या हल्ल्यात मानवाचा तर मानवाच्या करामतीमुळे वाघाचा बळी जात असल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे मानव आणि वाघ यांच्यातील संघर्ष कसा कमी करायचा, हा मुद्दा प्रशासनाला सतावत आहे.
 
मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी जंगलालगत असणाèया नागरिकांना जंगलात जाण्यापासून रोखणे, तसेच त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिवाय वाघ शेतात अथवा गावात येऊच नये यादृष्टीने वनविभागाच्या वतीने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाघाला लागणाèया सोयीसुविधा जंगलातच उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या दोन समस्यांवर वनविभागाने वेळीच कार्य करणे ही काळाची गरज आहे.
पाच वर्षांचा धडक कार्यक्रम हवा
वाघांची संख्या वाढली ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मात्र या संख्येवर शासनाने विचार करण्याची गरज आहे. वाघांची संख्या वाढली तर त्याचा अधिवास वाढविणे आणि वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष रोखणे या दोन मोठ्या समस्या वनविभागापुढे निर्माण झाल्या आहेत. वाघांचा अधिवास वाढविणे, त्यांचे भ्रमण सुरक्षित करने आणि वाघ- मानव संघर्ष रोखणे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वनविभागाने वृक्षलागवडीच्या मोहीमेप्रमाणे धडक कार्यक्रम राबविणे गरजेचे असल्याचे मत वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांनी व्यक्त केले.