लिपुलेखमधील घुसखोरी योग्यच

    दिनांक :30-Jul-2020
|
- नेपाळची मुजोरी कायम
काठमांडू, 
कालापानी, िंलपियाधुरा आणि लिपुलेख यासह भारताच्या 395 चौरस किमी भूभागावर दावा करणार्‍या नेपाळची मुजोरी अजूनही कायम आहे. या भागात नेपाळी नागरिकांनी केलेल्या घुसखोरीला नेपाळने वैध ठरवत त्याचे समर्थन केले आहे. एवढेच नव्हे, तर नेपाळने भारताला लिहिलेल्या पत्रात लिपुलेख, कालापानी, िंलपियाधुरा या भागावरील दाव्याचा पुनरुच्चार केला आहे.
 
 
Kalapani Nepal_1 &nb
 
नेपाळी नागरिकांना कालापानी, िंलपियाधुरा आणि लिपुलेख भागात अवैधपणे घुसखोरी करण्यापासून रोखण्याचे आवाहन भारताच्या उत्तराखंड प्रशासनाने नेपाळ प्रशासनाला पत्राद्वारे केले होते. नेपाळने भारताच्या या पत्राला उत्तर दिले असून आपली अडेलतट्‌टू भूमिका कायम ठेवली आहे. नेपाळने आपल्या पत्रात कालापानी, लिपुलेख आणि िंलपियाधुरी आदी भाग हा नेपाळच्या अखत्यारीत येत असल्याच्या दावा केला आहे.
 
 
नेपाळच्या धारचुला भागाचे जिल्हाधिकारी शरदकुमार यांनी सांगितले की, सुगौली करारानुसार कलम पाच, नकाशे आणि ऐतिहासिक दस्ताऐवजांनुसार कालापानी लििंपयाधुरी आणि लिपुलेख परिसर नेपाळचा भूभाग असल्याचा दावा केला आहे. भारताने या भागात नेपाळी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी आणू नये, असेही नेपाळ सरकारने म्हटले आहे. हा भाग नेपाळचा असल्यामुळे नेपाळी नागरिक आपल्या प्रदेशात जाणार, त्यामुळे त्यांना भारताने अटकाव करू नये अशी मल्लिनाथी शरदकुमार यांनी केली.
 
 
नेपाळचा नवीन नकाशानुसार दावा
या नव्या नकाशानुसार, लिपुलेख, कालापानी, िंलपियाधुरा आदी भाग हे नेपाळमध्ये दाखवण्यात आले आहेत. वास्तविक हा परिसर भारताचाच भूभाग आहे. नेपाळच्या या शिरजोरीवर भारताने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. लिपुलेख या भागात भारत, नेपाळ आणि चीनची सीमा एकत्र येते. त्यामुळे या भागाला विशेष महत्त्व आहे.