बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्र यांचे निधन

    दिनांक :30-Jul-2020
|

Somen Mitra_1  

 
कोलकाता, 
पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष सोमेन मित्रा यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. मित्रा हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते व लोकसभेचे माजी सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे. गुरुवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली, असे रुग्णालयाच्या सूत्राने सांगितले.