राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत सेहवाग, सरदार सिंग यांचा समावेश

    दिनांक :31-Jul-2020
|
नवी दिल्ली, 
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि आंतरराष्ट्रीय हॉकीपटू सरदार सिंग  यांचा यावर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारार्थ्यांची निवड करण्यासाठी 12 सदस्यांची समिती गठित केली आहे.
 
 
Sehwag-Sardar Singh_1&nbs
 
गतवर्षी प्रमाणे यंदाही सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती मुकुंदकम शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती खेळाडू व प्रशिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करणार आहेत. या समितीत पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेती दीपा मलिक हिचासुद्धा समावेश करण्यात आला आहे.
 
 
यावर्षीसुद्धा आम्ही सर्व पुरस्कारांसाठी एकच निवड समितीची कल्पना कायम ठेवली आहे, कारण वेगवेगळ्या समित्या केवळ अडचणी व वाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात, असे क्रीडा मंत्रालयाच्या एका सूत्राने सांगितले.
 
 
अन्य सदस्यांमध्ये माजी टेबल टेनिसपटू मोनालिसा बारुआ मेहता, मुष्टियोद्धा वेंकटेशन देवराजन तसेच क्रीडा समालोचक मनीष बटाव्हिया व पत्रकार आलोक सिन्हा व नीरू भाटिया यांचा समावेश आहे.
 
 
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या जन्मदिनी अर्थात दरवर्षी प्रमाणे 29 ऑगस्ट रोजी होणार आहे.