अभिनेत्री रोहिणी सिंहचा कार अपघात

    दिनांक :31-Jul-2020
|
दाक्षिणात्य अभिनेत्री रोहिणी सिंहचा कार अपघात झाला आहे. या कारमध्ये तिच्यासोबत अभिनेता जय जगदिश यांची मुलगी अर्पिता देखील होती. दोघंही या अपघातात जबरदस्त जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Rohin Singh_1   
 
एका वृत्त वाहणीने  दिलेल्या वृत्तानुसार रोहीणी आणि अर्पिता एका बर्थडे पार्टीवरुन आपल्या घरी परतत होते. त्यावेळी बंगळुरमधील मावल्लीपुरा येथे त्यांच्या कारचे  नियंत्रण सुटले  आणि त्यांचा अपघात झाला. त्यानंतर जखमी अवस्थेतील या तरुणींना तेथे जमलेले लोकांनी दुसऱ्या एका गाडीच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र दोघांचे हात पाय फ्रॅक्चर झाले आहेत. येत्या तीन आठवड्यात त्यांना रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता आहे.
रोहिणी सिंह कन्नड सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत ‘बेंकि बिरुगली’, ‘कटारी विरा’ ‘सुरासुंदरागीनी’, ‘काला माल्ला सुल्ला’, ‘कंतीरावा’ या चार चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांमध्ये ती फारशी झळकलेली नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच चर्चेत असते.