पहिल्या सामन्यात इंग्लंडचा आयर्लण्डवर विजय

    दिनांक :31-Jul-2020
|
- डेव्हिड विली सामनावीर

साऊदम्पटन,
डेव्हिड विलीने पाच बळी टिपण्याची जबरदस्त कामगिरी करत आपले पुनरागमन साजरे केले. डेव्हिडची प्रभावी गोलंदाजी व सॅम वििंलग व इयॉन मॉर्गनच्या तडाखेबंद फलंदाजीच्या बळावर विश्वविजेत्या इंग्लंडने आयर्लण्डविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात 6 गड्यांनी विजय नोंदविला.
 
 
David willy_1  
 
दिवस-रात्र काळात खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने आयर्लण्डला 44.4 षटकात 172 धावांवर रोखले आणि त्यानंतर यजमान इंग्लंडने 6 गडी राखून विजयाचे लक्ष्य गाठले.
 
 
विश्वचषक िंजकल्यानंतर प्रथमच इंग्लंड मायभूमीवर आपला पहिला वन-डे सामना खेळला. विश्वचषकाच्या वेळी डेव्हिड विलीला इंग्लंड संघातून वगळण्यात आले होते व जोफ्रा आर्चरला स्थान देण्यात आले होते. सध्या काही नियमित खेळाडू कसोटी क्रिकेटमधील व्यस्त असल्यामुळे डेव्हिड विलीला पुनरागमनाची संधी मिळाली. त्यानेही या संधीचे सोने करत 30 धावात प्रतिस्पर्धी आयर्लण्डचा निम्मा संघ गुंडाळून आपली उपयुक्तता सिद्ध केली. डेव्हिडच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने पहिल्या 3.3 षटकातच 4 फलंदाजांना बाद करून आयर्लण्डचे कंबरडे मोडले. सॅम बििंलग व कर्णधार इयॉन मॉर्गनने दमदार फलंदाजी करत इंग्लंड संघाचा विजय साकार केला.
 
 
संक्षिप्त धावफलक ः आयर्लण्ड 44.4 षटकात सर्वबाद 172 (कर्टिस कॅम्फर 59, अॅण्डी मॅकब्रिन 40, डेव्हिड विली 5-30, साकिब महमूद 2-36, आदिल रशिद व टॉम कुरान प्रत्येकी 1 बळी) पराभूत वि. इंग्लंड 27.5 षटकात 4 बाद 174 (सॅम बििंलग नाबाद 67, इयॉन मॉर्गन नाबाद 36, जॉनी रॉय 24, जेम्स विन्स 25, क्रेग यंग 2-56, मॅकब्रिन व कॅम्फेर प्रत्येकी 1 बळी).