इशरत जहॉंची याचिका न्यायालयाने फेटाळली

    दिनांक :31-Jul-2020
|
नवी दिल्ली, 
बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेली कॉंगे्रसची माजी नगरसेविका इशरत जहॉंची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज शुक्रवारी फेटाळून लावली. तिच्याविरुद्धचा तपास पूर्ण करण्यासाठी पोलिसांना आणखी 60 दिवसांचा कालावधी वाढवून देण्याच्या आदेशाला तिने आव्हान दिले होते.
 
 
Ishrat Jahan_1  
 
ठराविक मुदतीत तपास पूर्ण झाला नाही, तर तपासासाठी आणखी अवधी देण्यात काहीच चुकीचे नाही. विशेष न्यायालयाचा या बाबतचा निर्णय योग्यच असल्याने, आम्ही तुमची याचिका फेटाळत आहोत, असे न्या. सुरेशकुमार कैत यांनी आपल्या निकालात स्पष्ट केले. 26 फेबु्रवारी रोजी इशरतला अटक करण्यात आली होती.
 
 
माझ्या प्रकरणात पोलिसांनी 90 दिवसांच्या आत तपास पूर्ण केला नाही, त्यामुळे मला जामीन देण्यात यावा, असा दावा करतानाच तिने तपासाचा अवधी वाढविण्याच्या निर्णयालाही आव्हान दिले होते. तुमची याचिका गुणवत्तेवर आधारित नसल्याचे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.