नव्या शैक्षणिक धोरणाने क्रांतिकारक बदल

    दिनांक :31-Jul-2020
|
-कुशल मनुष्यबळाची निर्मिती
-संशोधन विकासाला वाव
नागपूर, 
केंद्र शासनाने नुकतेच नवे सर्र्वकष शैक्षणिक धोरण घोषित केले. या धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्राला नवी उभारी मिळेल आणि देशविकास, रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, स्वयंरोजगारासाठी पात्र युवकांची फौज उभी करण्यास मदत होईल तसेच नव्या पीढीला या धोरणाने क्रांतिकारक बदल अनुभवता येतील अशा तरतुदी त्यात आहेत. या नव्या धोरणासंदर्भात शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

०१२३४५६७८९_1  H 
अंमलबजावणीबाबत संभ्रम : नागो गाणार
केंद्र सरकारने घोषित केलेले नवे शैक्षणिक धोरण समाधानकारक आणि त्यामुळे आनंद देखील झाला पण आजवरचा अनुभव लक्षात घेता, हे धोरण व त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होईल qकवा नाही, याविषयी मनात संभ्रम असल्याचे मत शिक्षक आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केले. केंद्र शासनाचा हेतू चांगला आहे पण गतकाळातील अशा धोरणांचा आमचा अनुभव चांगला नाही. आर्थिक आणि सामाजिक स्थितीत हे कसे अंमलात येणार हा विषय आहे. ‘शिक्षणात राजकारण नको पण राजकारणात शिक्षण हवेङ्क अशी आमची भूमिका आहे पण स्थिती उलट आहे. शिक्षणात प्रचंड राजकारण आहे आणि राजकारणात शिक्षण मुळीच नाही. या स्थितीमुळे धोरणाचे काय होणार याविषयी काही संभ्रम असल्याचेही आ. गाणार यांनी सांगितले.
बहुशाखीय पद्धती लाभदायी : डॉ. मंजुश्री सरदेशपांडे 
 
मागील ३४ वर्षानंतर केंद्राचे सर्र्वकष शैक्षणिक धोरण आले आहे. कोणत्याही विद्याथ्र्यांला एका शाखेत बांधता येत नाही. या धोरणानुसार कुणाला, कुठलाही विषय निवडता येईल. याशिवाय शैक्षणिक बँक ही योजना उत्तम आहे. त्याचा सर्व विद्याथ्र्यांना लाभ होईल. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाला वाव असल्यामुळे यातून रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगार करणाèयांना लाभ होईल. प्रत्येक विद्याथ्र्याला किमान एका प्रकारचे कौशल्य आत्मसात करणे शक्य होइल असे मत बालभारतीच्या अध्यक्षा आणि विद्याभारती उच्चशिक्षण शाखेच्या उपाध्यक्षा डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी व्यक्त केले.

प्राचीन विषयांचा अभ्यास होणार : डॉ. मंगेश पाठक 
 
केंद्राने दिलेले धोरण सर्वसमावेशक आहे. यापूर्वीच्या धोरणातील उणीवा यातून दूर करण्यात आल्या आहेत. सर्व इयत्तांची विभागणी ज्या पद्धतीने करण्यात आली. तो भाग विद्याथ्र्यांना अभ्यासाला पुरक ठरणार आहे. बहुशाखीय प्रणाली अधिक उपयुक्त ठरणार आहे. यातून विद्याथ्र्यांमधील गुणांना वाव मिळेल शिवाय त्यांना शैक्षणिक बंधनात रहावे लागणार नाही असे मत विद्या भारतीचे प्रांत सहमंत्री डॉ. मंगेश पाठक यांनी व्यक्त केले.
अंगणवाडीला प्राथमिक शिक्षकाची जोड : प्रकाश कापसे 
सध्याच्या स्थितीत गावात अंगणवाडी पद्धती लुप्तप्राय झाली होती. नव्या पॅटर्नमध्ये अंगणवाडीला प्राथमिक शिक्षण आणि शिक्षकांची जोड मिळेल. लहान मुलांचा शैक्षणिक आणि आरोग्य विकास शक्य होईल. ९ ते १२ वी इयत्ता याच्या एकत्रिकणामुळे आणि त्यात एक विषय कौशल्य विकासाचा असल्याने परंपरागत व्यवसाय करणे अधिक सुयोग्यपणे शक्य होईल असे मत विद्याभारतीचे महानगरप्रमुख प्रकाश कापसे यांनी व्यक्त केले.