जिल्हास्तरीय ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धा १ ऑगस्टपासून

    दिनांक :31-Jul-2020
|
नागपूर,
ऑनलाईन ब्लिट्ज बुद्धिबळ स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने शहरातील बुद्धिबळपटूंसाठी द्विदिवसीय आठवडी जलद बुद्धिबळ स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे. शनिवार १ आणि रविवार २ ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा सायंकाळी ६ वाजतापासून ऑनलाईन व्यासपीठ लिचेस डॉट ओआरजी वर होणार आहे.
 
 
chess_1  H x W:
 
स्पर्धेत अधिकाधिक आठ फेऱ्या होणार असून जिल्ह्यातील खेळाडूंना यात सहभागी होता येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी तीन हजार रुपयाची राशी घोषित करण्यात आली असून प्रवेशशुल्क शंभर रुपये ठेवण्यात आले आहे. इच्छुकांना ३१ जुलै रात्री साडे अकरा पर्यंत प्रवेश नोंदविता येणार असून ज्यांनी प्रवेश नोंदविला नाही अशांना स्पर्धेच्या दिवशी विलंब शुल्क ५० रुपये भरुन प्रवेश नोंदविता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बुद्धिबळपटूंकडे ‘लिचेस डॉट ओआरजीङ्कची यूजर-आईडी असणे अनिवार्य आहे. अधिक माहीतीसाठी आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण पानतावने, स्वप्निल बन्सोड, फीडे पंच उमेश पनबुडे यांच्याशी खेळाडूंनी संपर्क साधावा.