माजी गृहसचिव राम प्रधान यांचे निधन

    दिनांक :31-Jul-2020
|
मुंबई, 
ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांनी केंद्रीय गृहसचिवपद देखील भूषविले होते. राम प्रधान यांनी आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत गृह, संरक्षण तसेच वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून भरीव कामगिरी केली. 
 
 
Ram Pradhan_1  
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम प्रधान यांच्या निधनानंतर टि्‌वट करीत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक बुद्धिमान व व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपले,’ असे त्यांनी आपल्या टि्‌वटमध्ये म्हटले आहे.
 
 
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राम प्रधान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘केंद्रीय गृहसचिव म्हणून त्यांनी पंजाब, आसाम अशा विविध प्रश्नांच्या सोडवणुकीत मोलाचे योगदान दिले. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर चौकशी आयोग त्यांच्याच अध्यक्षतेत स्थापित करण्यात आला होता. एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व त्यांच्या जाण्याने हरपले आहे’, असे फडणवीस यांनी आपल्या टि्‌वटमध्ये म्हटले आहे.