बिहारच्या 'लाईफलाईन'चे गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

    दिनांक :31-Jul-2020
|
- देशातील पहिला अत्याधुनिक पूल
नागपूर,
बिहारची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा गांधी सेतूच्या नवीन वाहिनीचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे लोकार्पण झाले.
 

lokarpan_1  H x 
 
या पुलामुळे दक्षिण व उत्तर बिहार जोडले जाणार असून या पूल नसता तर अर्ध्या बिहारचा संपर्क होऊ शकला नसता. या पुलामुळे व आणखी 6 पूल गंगेवर उभारण्यात येत असल्यामुळे बिहारची अर्थव्यवस्था मजबूत होऊन बिहारची लिची, हस्तकलेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा, असे ना. गडकरी यांचे स्वप्न असून ते साकार करण्यासाठी या पुलांचे बिहारसाठी खूप महत्त्व आहे.
 
 
या कार्यक्रमाला ऑनलाईन बिहारचे मुख्यमंत्री नितीन कुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, ना. रामविलास पासवान, ना. नित्यानंद राय, ना. अश्विनी चौबे, ना. जन. व्ही. के. सिंग, ना. नंदकिशोर यादव, खासदार व आमदार उपस्थित होते.
 
या पुलासाठी वापरण्यात आलेले नवे तंत्रज्ञान देशात प्रथमच वापरण्यात आले असून 1742 कोटी खर्च या पुलासाठी येणार आहे. 5575 मीटर लांबी या पुलाची असून सुमारे 25 लाख नटबोल्ट या तंत्रज्ञानात काम करताना वापरण्यात आले. उत्तर व दक्षिण बिहारला जोडणारा हा बिहारसाठी महत्त्वाकांक्षी पूल आहे. गंगानदीवरून हा पूल बांधण्यात आला. या प्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- या पुलाच्या कामसाठी जगभरातील तांत्रिक सल्लागारांशी चर्चा करून नंतर हे तंत्रज्ञान वापरण्यात आले. भविष्यात हे तंत्रज्ञान दिशादर्शक ठरणार असून तांत्रिक विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. बिहार, पंजाब, हरयाणा, दिल्ली हे जलमार्ग सुरु झाले तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्रच बदलून जाणार आहे. बिहारच्या विकासासाठी जलमार्ग हे वरदान ठरतील. याशिवाय 10338 कोटींचे 6 पूल बिहारची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करतील, असेही ते म्हणाले.
 
 
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याशिवाय, आर्थिक विकासासोबत औद्योगिक विकास झाल्याशिवाय रोजगार निर्मिती होणार नाही. आणि रोजगार निर्मिती झाली नाही तर गरिबी, भूकमरी संपणार नाही. बिहारच्या रस्त्यांशेजारी विविध उद्योगांचे समूह एकत्र येऊन विकास होऊ शकतो, याचा विचार केला जावा. भयभूक आतंक मुक्त देश बनविणे आपला उद्देश आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आम्ही बिहारच्या कासासाठी कटिबध्द आहोत, असेही ना. गडकरी यांनी सांगितले.