पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर रॉकेट हल्ला

    दिनांक :31-Jul-2020
|
- ९ ठार, ५० हून अधिकजखमी
काबूल,
अफगाणिस्तानच्या नागरी वस्त्या असलेल्या भागात पाकिस्तानने रॉकेट केला आहे. या हल्ल्यात ९ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या माध्यमांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे.
 

afgan halla_1   
 
कंधार प्रांतातील स्पीन बोल्डक जिल्ह्यात पाकिस्तानाने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर अफगाण सैन्यांना पाकिस्तानी सैन्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या हल्ल्याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. अफगाण संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली आहे, अशी माहिती अफगाणिस्तानातील एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
संरक्षण मंत्रालयानुसार, पाकिस्तानी सैनिकांनी निवासी भागात केलेल्या रॉकेट हल्ल्यात ९ नागरिक ठार झाले आहेत. तर ५० जण गंभीर जखमी झाले आहेत. अफगाणिस्तान लष्करप्रमुख जनरल मोहम्मद यासीन झिया लेवी यांनी पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी सर्व सैन्य दलाला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. झिया यांच्या नेतृत्वात हवाई दल आणि विशेष सैन्य दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.