२४ तासात २३२ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

    दिनांक :01-Aug-2020
|
मुंबई,
राज्यात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासात राज्यात २३२ पोलिसांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ९,४४९ वर पोहोचली आहे. यात अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

mh police_1  H  
 
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूने राज्यातील पोलिसांनादेखील आपल्या विळख्यात ओढले आहे. गेल्या २४ तासात २३२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या राज्यात १,९३२ पोलिसांवर उपचार सुरु आहे. तर ७,४१४ पोलिसांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर, दुरदैवाने १०३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाची लक्षण असणाऱ्या पोलिसांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत ९७१ अधिकारी आणि ८४७८ पोलिस कर्मचारी अशा एकूण ९,४४९ पोलिसांचा कोरोनाची लागण झाली आहे. यात २१९ पोलिस अधिकारी आणि १७१३ पोलिस कर्मचाऱ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर ७४३ अधिकारी आणि ६६७१ पोलिस कर्मचारी असे एकूण ७,४१४ बरे होऊन घरी परतले आहेत.