रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर 5 ऑगस्टला सुनावणी

    दिनांक :01-Aug-2020
|
नवी दिल्ली,
अभिनेता सुशांतिंसह राजपूत आत्महत्या प्रकरणी माझ्याविरुद्ध पाटण्यात दाखल झालेला गुन्हा मुंबईत वर्ग करण्यात यावा, अशी विनंती करणार्‍या अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर येत्या 5 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे.
 
 
Riya_1  H x W:
 
सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर या याचिकेवरील सुनावणीची तारीख देण्यात आली आहे. न्या. हृषिकेश रॉय यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनात ही सुनावणी होणार आहे.
 
 
दरम्यान, महाराष्ट्र आणि बिहार सरकारने तसेच सुशांतचे वडील कृष्ण किशोरिंसह यांनी या प्रकरणी आधीच कॅव्हेट दाखल केला असल्याने, रियाच्या याचिकेवर कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी न्यायालयाला या दोन्ही राज्यांची बाजू ऐकून घ्यावी लागणार आहे. पाटणा पोलिसांनी रियाविरुद्ध सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.