विदर्भात युरियाचा तुटवडा

    दिनांक :01-Aug-2020
|
-कृषी अधिकाèयांनी नियोजन करावे
-भारतीय किसान संघाची मागणी
नागपूर,
विदर्भात सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात युरियाचा तुटवडा जाणवत असून त्याचा फटका विविध पिकांच्या उत्पादनाला बसणार आहे. ही समस्या नेहमीचीच असून यंदा कोरोना निमित्तमात्र ठरला, असे जाणकारांचे मत आहे.

uria_1  H x W:  
यंदा निसर्गाच्या कृपेने विदर्भात विविध ठिकाणी आतापर्यंत पेरण्या झाल्या आहेत. निरंतर पडणाèया पावसामुळे काही भागात पिकांची पाने पिवळी पडत आहे. त्यामुळे युरिया खताची मागणी वाढली आहे. शेतकèयांकडून युरिया खताची मागणी वाढलेली असतानाच काही जिल्ह्यात नाही म्हणायला युरियाचा पुरवठा होतो आहे. विक्री केंद्रावर त्याचे वाटपही केले जात आहे.
मात्र, मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने अनेक ठिकाणी युरियाचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत संघटक रमेश मांदाळे यांनी सांगितले.
 
ते म्हणाले की, मुळात शेतकèयांनी जैविक शेतीवरच भर द्यायला हवा. पण, विदर्भातील काही जिल्ह्यात युरियाचा तुटवडा आहे. काही ठिकाणी युरियाचा जादा साठा करून चढ्या भवात विक्री केली जात आहे. यावर्षी काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने त्या भागातील शेतकèयांनी पेरणी आटोपली. काही ठिकाणी पिकांची उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट उद्भवले आहे. मात्र, सध्या काही ठिकाणी पिकांना युरियाची गरज असताना तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा घेत काळाबाजार सुरू झाला आहे.
 
काही ठिकाणी बोगस बियाण्यांमुळे त्रासलेल्या शेतकèयांना युरियाच्या तुटवड्यामुळे लुटले जात आहे. कुठे मका, कपाशी, कुठे मूग उडीद, कुठे सोयाबीन वा इतरपिकांची रोपटे जमिनीवर आली असून त्यांना वाढीसाठी युरियाची अत्यंत गरज आहे. युरिया मिळत नसल्याने त्यांची चिता वाढली आहे. वेळेत युरिया न मिळाल्याने पिकांची आवश्यक तेवढी वाढ होणार नाही. शेवटी पिकांच्या उत्पादनास त्याचा फटका बसणार आहे.
 
युरियाच्या तुटवड्यासाठी कंपनीचे अधिकारी आणि वितरक जबाबदार असल्याचा आरोप भारतीय किसान संघाचे युवा प्रमुख राहुल राठी यांनी केला. ते म्हणाले की, कंपनीचे अधिकारी आणि वितरकांकडून युरियाचा योग्य तो पुरवठाच केला जात नाही. एका शेतकèयास एका हंगामात साधारण १० पोती युरिया हवा असतो. प्रत्यक्षात पुरवठाच अपुरा केला जात असल्याने विक्रेते नाईलाजाने शक्य झाल्यास २ पोती देतो.
 
मुळात कृषी अधिकाèयांनी युरियाच्या पुरवठ्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. हंगामाआधी त्याचे नियोजन करायला हवे. मागणी किती राहील, यासंबंधी शेतकरी, कृषी विक्रेत आदींसोबत चर्चा करून हे ठरवून त्यापेक्षी थोडी अधिक मागणी आधीच संबंधित कंपन्यांकडे नोंदवायला हवी. काही ठिकाणी कृषी अधिकारी आता हे करीत आहे, पण हा उशीरच आहे. ते आधीच करायला हवे होते. वेळेत पुरवठा होईल, आणि योग्य वितरण होईल याची काळजी कृषी अधिकाèयांनी घ्यायला हवी, याकडे राहुल राठी यांनी लक्ष वेधले.

यंदा कोरोनामुळे अडचण
यंदा सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे पॉस मशिनवर अंगठे घेणे थांबवले गेले. त्यामुळेही घोळ झाला. टाळेबंदीमुळे वाहतूक बंद, मजुर मिळेनासे झाल्याने युरियाच्या वाहतुकीवर परिणाम झाला.