भाजपाने श्रीकृष्ण मूर्तीच्या दुग्धाभिषेकाने वेधले सरकारचे लक्ष

    दिनांक :01-Aug-2020
|
देऊळगाव राजा,
तालुका भाजपा व शहर भाजपाच्यावतीने स्थानिक बस स्टँड चौकामध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालून सरकार च लक्ष वेधले, गाईच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे. म्हशीच्या दुधाला पन्नास रुपय प्रति लीटर प्रमाणे भाव द्यावा. याप्रमाणे दूध भुकटी साठी प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी चे निवेदन तहसील यांना दिले.
 
 
abhishek_1  H x
 
महाराष्ट्राचे सरकार हे आघाडी सरकार नसून तिघाडी सरकार आहे. या शासनाच्या कार्याकाळामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. खत मिळत नाही. तर या अडचणीत भर म्हणून शासन दुधाला भाव देत नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसायसुद्धा अडचणीत आलेला आहे. तालुका व शहर भाजपाच्या वतीने गाईच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे दूध भुकटीसाठी प्रति किलो पन्नास रुपये अनुदान द्यावे व म्हशीच्या दुधाला पन्नास रुपये लिटरचा भाव द्यावा, अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारासुद्धा देण्यात आला आहे .
 
आंदोलनामध्ये डॉ. गणेश मांन्टे, तालुका अध्यक्ष विठोबा मुंढे शहराध्यक्ष प्रवीण धन्नावत, डॉ. रामदास शिंदे, डॉ. सुनील कायंदे, राजू टाकळकर, एकनाथ काकड, यादवराव भालेराव, गबाजी कुटे, संचित धन्नावत, सुजित गुंडे, श्याम बनकर, निशिकांत भावसार, सुधाकर जायभाये, धर्मराज हनुमंते, प्रवीण बन्सीले, गंगाराम परळकर, सलीम भाई, राजेश भुतडा, शुभम जायभाये, निलेश गीते, श्रीकृष्ण तिडके, शिवाजी काकड, अमोल काकड, श्रीराम बर्डे, कुमावत आदी कार्यकर्त्यांनी बस स्टॅण्ड चौकात दुग्धाभिषेक केला घोषणाबाजी केली व तहसीलदारांना निवेदन दिले.