भाजपातर्फे सरकारविरोधात रास्ता रोको आंदोलन

    दिनांक :01-Aug-2020
|
मेहकर,
दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नावरून स्थानिक भारतीय जनता पक्षाकडून गोरगरीब जनतेला दूध वाटप करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाला तोड देत आहे. कोरोनाच्या संकटामुळे दुध उत्पादक शेतकर्‍यांचे दुध संकलन होत नसल्यामुळे दुध उत्पादक शेतकर्‍याचे प्रंचड नुकसान होत आहे. शेतकर्‍यांच्या दुधाला योग्य तो दर मिळत नाही.
 
rasta roko_1  H 
 
राज्य सरकारने दुध उत्पादक शेतकर्‍यांसाठी घेतलेले निर्णय हे केवळ ठराविक दुध संघापुरतेच मर्यादित असून राज्यभरातील अन्य दुध उत्पादकावर अन्याय आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्यसरकार विरोधात रास्तारोको व दुध वाटप आंदोलन करण्यात आले. दुध उत्पादक शेतकर्‍यांला प्रती लिटर 10 रुपये अनुदान देण्यात यावे दुध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रती किलो 50 रूपये अनुदान द्यावे, तसेच गाईचा दुधाला 30 रूपये दर द्यावा, या मागण्यासह दुधाचा पिशव्या वाटप करून आंदोलन करण्यात आले.
 
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड. शिव ठाकरे पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर, रोशन काबरा, जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा अर्जुनराव वानखेड़े, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी अर्चना पांडे, महिला जिल्हा सरचिटणीस मंदाकिनी कंकाळ, किसान आघाडी जिल्हा सरचिटणीस सिताराम ठोकळ, जिल्हा संघटक किरण जोशी, राजेश टाले, राजेश नवले,महिला आघाडी तालुका अध्यक्षा पार्वती कान्हे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष प्रा.केशव पाटिल वाहेकर, निलेश नाहटा,शहर सरचिटनीस योगेश सौभागे, सुरेश निकस, मंगेश निकम पाटिल, सुरज शर्मा, मनोज गोरे, सागर बाजड, गणेश निकस सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.