भाजपाच्या दुध वाटप आंदोलनाला सर्वत्र प्रतिसाद

    दिनांक :01-Aug-2020
|
बुलडाणा,
भाजपा महायुतीच्या वतीने संपूर्ण दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या हक्कांच्या मागण्यासाठी राज्यव्यापी दुध बंद एल्गार आंदोलना चे आयोजन करण्यात आले होते.सध्याचे शासकीय दुधाचे भाव फारच कमी असल्याने तसेच वाढत्या महागाईत दूध उत्पादन खर्च वाढल्याने शेतकर्‍यांना दूध व्यवसाय बंद करावा लागत आहे. दूध उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. वेळोवेळी शासनाकडे दुधाचे दर वाढविण्या साठी निवेदन देऊन मागण्या करण्यात आल्या. निर्ढावलेले आघाडीचे बिघाडी सरकार दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या या रास्त प्रश्नांकडे लक्ष देत नाही. यामुळे आज जिल्हाभरात भाजपा च्या नेतृत्वात रयत क्रांती, रासप, शिवसंग्राम व रिपाई महायुतीच्या वतीने दूध बंद एल्गार आंदोलन आज 1 ऑगस्ट रोजी करण्यात आले. मोताळा येथे देवीदास वानखेडे, मनोहर नारखेडे, निनाजी घानोकार यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. गरजूंना दुधाचे वाटप करण्यात आले.
 

milk movement_1 &nbs 
 
जिल्हाभरात गावागावात दूध उत्पादक शेतकरी व भाजपा तसेच महायुतीतील घटक पक्ष कार्यकर्ते यांचे वतीने महाराष्ट्रातील आघाडी बिघाडी सरकार चा निषेध करण्यासाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय कुटे, भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. आकाश फुंडकर ,भाजपा जेष्टनेते चैनसुख संचेती, आ. श्वेता महाले तसेच योगेंद्र गोडे यांच्या नेतृत्वात दूध बंद एल्गार आंदोलन करण्यात आले.
 
 
राज्यसरकार ने दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे अथवा गाईचे दूध प्रति लिटर 30 रुपये दराने खरेदी करावे. दूध भुकटी निर्याती साठी परवानगी द्यावी, भुकटीला 1किलो मागे 50 रुपये अनुदान द्यावे. या प्रमुख मागण्यांसाठी सदर आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून दूध उत्पादक शेतकरी व भाजपा कार्यकर्त्यांनी मोफत दूध वाटप करून शासनाचे दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणी कडे लक्ष वेधले. दूध बंद एल्गार आंदोलनाला दूध उत्पादकांकडुन उत्तम प्रतिसाद मिळाला.