कोरोना संक्रमितांची संख्या १७ लाखांच्या उंबरठ्यावर

    दिनांक :01-Aug-2020
|
नवी दिल्ली,
देशातील कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दररोज नवा रेकॉर्ड मोडणारी रुग्णसंख्या समोर येत आहे. ५० हजारांनी वाढणारी रुग्णसंख्या आता ६० हजारांच्या जवळ गेली आहे. त्यामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात आढळून आलेल्या रुग्णवाढीचा विस्फोट झाला असून देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे आता देशातील कोरोना संक्रमितांची संख्या १७ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
 

desh _1  H x W: 
 
गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे तब्बल ५७ हजार ११७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णवाढीने आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. तर गेल्या २४ तासात ७६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ लाख ९५ हजार ९८८ वर पोहोचली आहे. तर, देशात आतापर्यंत ३६ हजार ५११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात सध्या ५ लाख ६५ हजार १०३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे १० लाख ९४ हजार ३७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
देशात सध्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात कोरोनाच्या आतापर्यंत एकूण १ कोटी ९३ लाख ५८ हजार ६५९  चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर काल एका दिवसात ५ लाख २५ हजार ६८९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली.