गडचिरोलीत वीज पडून १ महिला ठार, ९ जखमी

    दिनांक :01-Aug-2020
|
- अहेरी तालुक्यातील चिंचूगुंडी गावाजवळील घटना
अहेरी,
तालुक्यातील चिंचूगुंडी गावामध्ये कापसाच्या पिकाला औषधी टाकण्यासाठी गेलेल्या मजुरांवर दुपारी 2.30 वाजता च्या सुमारास वीज कोसळून 1 जागीच ठार तर 9 जण जखमी असून त्यांच्या वर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
 
 
lightening in gadchiroli_
 
मजुरांनी दुपारी औषधी टाकून जेवण करून विश्रांती घेत होते, दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झालं, पावसापासून बचाव करण्यासाठी आंब्याच्या झाडा जवळ जाऊन उभे होते, तेंव्हाच जीव कोसळल्याने 1 जण जागीच ठार झाली अन्य मजूर जखमी अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले आहे.
 
 
यामध्ये पोसक्का चिन्ना तोटावार वय 35 रा. चिंचूगुंडी यांचं जागीच ठार झाल्या, जखमींमध्ये अरविंद मल्लेश गुम्पा वय 8 रा रेगुंटा, लक्ष्मी मलेश गुम्पा वय 40 रा रेगुंटा, गणपत नागना कुमराम वय 38, सारका लचमा पानेम वय 15, नागुबाई बापू पानेम वय 22, वैशाली लिंगा तोटावार वय 18, सुनीता श्रीकांत टेकुलवार वय 25, स्नेहा शंकर पानेम वय 17, मलेश्वरी शंकर पानेम वय 35 सर्व जण चिंचूगुंडी येथील रहिवासी आहेत.
 
 
रुग्णालयातील अधिपरिचारिका व डॉ. चेतन इंगोले, डॉ. रवींद्र वाठोरे यांनी जखमीं मजुरांवर तात्काळ उपचार सुरू केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबलू भैयाजी हकीम व शाहीन भाभी हकीम यांनी रुग्णालयात येऊन रूग्णांना भेट देऊन विचारपूस केली.