मंतरलेले घरटे

    दिनांक :01-Aug-2020
|
"चित्र घराचे धुसर धुसर
हिरव्या हिरव्या शेणसड्याने
मंतरलेले घरटे सुंदर"
मजबूत कौटुंबिक पायावर घराचा बुरूज उभा असतो. घर हे अनेक सुखदुःखाचा साक्षीदार असते. जाणून घेऊ घराचे महत्त्व.
 

gharte_1  H x W 
 
आपले स्वतःचे एक घर हवे. असे घर जे प्रेमाने ओथंबलेले, हर्षाने, उल्हासने सदैव चिरतरुण असणारे, नात्यांचा स्नेह, आपलेपणा, ओढ, भरभरून असणारे आपले घर. चला तर जाऊया आपल्या स्वप्नातील घरात. कारण, मनुष्य स्वप्नाळू होऊनच सत्यात वर्तमान आणि भविष्य साकारतो. कारण भूतकाळ मागे सरत असला तरी स्वप्न हे आपल्या स्मृतीप्रमाणे शिळे कधीही होत नसते. कारण स्मृती ह्या मनुष्याच्या मनाप्रमाणेच चिरतरुण असतात.
 
घर हे भाड्याचे, स्वतःच्या अथांग मेहनतीचा परिपाक एकत्रित करून आकारास आलेली वास्तू. अशा परिपूर्ण घरात आपण येतो, रुजवतो, सर्वार्थाने आपले आहे, या भावनेने प्रस्थापित होतो. विविध नानाविध कल्पना मूर्ततेने आकाराला येतात. आजी, आजोबा, आई, बाबा, बहीण, भाऊ या आपुलकीच्या माणसामध्ये मायेच्या वर्षावाने सुखासमधनात आपले घर न्हाऊन निघत असते. विविध पैलूंनी आकारलेले घर हे केवळ भिंती, दारे, खिडक्या नसून प्रत्येक व्यक्तींच्या सुख, दुःखाचे माहेर असते. अशा या घरातील रडणे, हसणे, लहान मुलांचे बोबडे बोल, भावा बहीणचे भांडणे, त्या भांडणातून एक होणे, आई बाबाच्या प्रेमाचा सतत अखंड वाहणारा, खलालणार झरा होणे, आजी आजोबाच्या अनुभवांनी एकमेकांचा आधार होऊन परिपूर्ण घर आशीर्वादाच्या रोपट्याचे रूपांतर संपन्न वटवृक्षात होत असते. जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनांची एकमेव साक्षीदार असते हे ही घर. जे एखाद्या कल्पवृक्षप्रमाणे सर्वांच्या आशा आकांक्षा संपूर्ण करते.
 
अंगणातील तुळशीमायेच्या पणतीचा आयुष्यभर पुरणारा लखलखता प्रकाश अंधकाररुपी तिमिराला मागे सारून झगमगाट करेल आणि सर्वाना आनंद देईल.
"ओम सर्वसिद्धीप्रदाय सर्वशुभमकराय
प्रसन्न वदनाय विश्वमभराय परम पुरुषाय
शुक्र वरदाय वास्तोष्तये नमः
ओम नमो वास्तुदेवाय नमः

- रश्मी संदीप कोराने