महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचे निधन

    दिनांक :01-Aug-2020
|
मुंबई,
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचे कोरोनामुळे आज शनिवारी निधन झाले. सुनिल कदम असे त्यांच्या भावाचे नाव होते. गेल्या सात दिवसांपासून सुनिल कदम यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, त्यांची कोरोनासोबत सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि आज त्यांची अखेरचा श्वास घेतला. किशोरी पेडणेकर यांनी भावाच्या आठवणीत ट्विटरवर एक कविताही पोस्ट केली आहे.

kishori pednekar_1 & 
 
माझा भाऊ सुनील कदम यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच भगवान चरणी प्रार्थना, असे किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. 
गेल्या एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर यादेखील होम क्वारंटाइन झाल्या होत्या. बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केले होते.