कालिदास विद्यापीठात उद्या पासून संस्कृत महोत्सव

    दिनांक :01-Aug-2020
|
नागपूर,
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विस्तार सेवा मंडळातर्फे येत्या सोमवार3 ऑगस्ट रोजी ऑनलाईन माध्यमातून साजरा केला जात आहे. या महोत्सवाचे आयोजन भारताचे हृदयस्थान असलेल्या नागपुरातून होत असून, याद्वारे संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार व्यापक व प्रभावी रितीने सर्वत्रा होईल.

kulguru_1  H x  
या महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल व कुलपती भगत िंसग कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रिय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीयाल तसेच महाराष्टांचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्राी उदय सामंत प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती एका पत्रपरिषदेत कुलगुरु प्रा. श्रीनिवास वरखेडी यांनी दिली.
 
या महोत्सवात सारस्वत अतिथी म्हणून राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे माजी कुलगुरू प्रो. व्ही कुटुंबशास्त्राी यांच्यासह. कुलगुरू श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव प्रा. विजयकुमार विशेषत्वाने उपस्थित राहतील.
 
ऑनलाईन संस्कृत महोत्सव - कोविड 19 च्या पार्श्र्वभूमीवर प्रथमच हा महोत्सव आभासी पद्धतीने साजरा होणार आहे. भारतभरातील संस्था व संस्कृतानुरागींचा सहभाग असून महोत्सवाच्या उद्घाटन समारोहात 200 हून अधिक संस्था आणि 10 हजाराहून अधिक संस्कृतप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
 
संस्कृत मासात 100 हून अधिक कार्यक‘म - संस्कृत महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृत भाषा प्रचार-प्रसार आणि प्राचीन ज्ञानभांडाराचा परिचय होण्यासाठी संस्कृत चळवळ चालविली जाणार आहे. यामध्ये भारतीय तसेच विदेशी संस्कृतप्रेमी संस्था यांचा सकि‘य सहभाग राहणार आहे. 3 तारखेपासून हा संस्कृतोत्सव महिनाभर सुरू राहणार असून महाराष्टांतील विविध संस्था, महाविद्यालये संस्कृताधारित स्पर्धा व कार्यक‘मांचे आयोजन करणार आहेत. जवळपास 100 कार्यक‘म येत्या महिन्याभरात आयोजित करण्यात येणार आहेत.
 
प्रासंगिकता प्रस्थापित करणे व समाजाच्या जीवनशैलीत विशिष्टत्व आणणे हे प्रमुख उद्दिष्ट या आयोजनामागे आहे. विश्र्वविद्यालयाच्या रामटेक येथे प.पू. गोळवलकर गुरुजी गुरुकुल येथे पारंपरिक अभ्यासक‘म, वारंगा येथे आधुनिक अभ्यासक‘म आणि विस्तार सेवा मंडळातर्फे संपूर्ण महाराष्टांत गुरु-शिष्य परंपरातर्ंगत विविध अभ्यासक‘म व कार्यक‘म राबविले जातात.
 
यावर्षी संस्कृत क्षेत्रातील विद्वन्मणी, राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे माजी कुलगुरू तसेच आंतरराष्टींय संस्कृत संघाचे पूर्वाध्यक्ष प्रो. व्ही कुटुंबशास्त्राी यांना ‘‘प्राच्यविद्यावाचस्पती’’ या उपाधीने तसेच गत 25 वर्षांपासून संस्कृत भारती संस्थेतर्फे प्रकाशित होणा-या संभाषण संदेश संस्कृत पत्रिकेला ‘‘गीर्वाणवाणीसपर्यापुरस्कार’’ स्वरूपात संस्कृत सेवा सन्मान प्रदान केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेला समन्वयक प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, राज्य समन्वयक डॉ. प्रसाद गोखले, कुलसचिव प्रो. विजयकुमार, कमल जोशी, उपाध्यक्ष, जनसंपर्क अधिकारी डॉ. रेणुका बोकारे उपस्थित होते.
सांस्कृतिक नजराणा - गीत-मेघदूतम्‌
गीत-मेघदूतम्‌ - संस्कृत महोत्सवाच्या उद्घाटन समारोहातर्ंगत महाकवी कालिदासाचे अमर खंडकाव्य मेघदूतम्‌ मधील निवडक श्र्लोकांचे आस्वादपर निरूपण आणि गायन असा कार्यक‘म सादर होणार आहे. या कार्यक‘माची संकल्पना व निवेदन प्राची जांभेकर यांची असून, धनश्री शेजवलकर श्र्लोकांचे गायन करणार आहे. संगीत डॉ. केशवचैतन्य कुंटे यांचे तर संवादिनी साथ पूनम पंडित करणार आहेत.
00000000