भाजपाच्या दूध आंदोलनाला वाशीम जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

    दिनांक :01-Aug-2020
|
- कारंजा येथे सरकाररूपी दगडाला प्रतिकात्मक दुग्धाभिषेक
- वाशीम येथे गरिबांना दुध वाटून केला निषेध
वाशीम,
आतापर्यंत दुध प्रश्‍नावर काहीच निर्णय न झाल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात ठिकठिकाण दूध अनुदान व शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी एल्गार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

milk agitation_1 &nb  
 
वाशीम येथील शासकीय दूध शितकरण केंद्रासमोर भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी वाशीम शहर शाखेच्या वतीने दूर आंदोलन करण्यात आले. यावेळी दूधाला अनुदान व दरवाढ मिळालीच पाहीजे, बोगस बियाणे नुकसान प्रकरणी शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळालीच पाहीजे आदीसह विविध मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात आमदार राजेंद्र पाटणी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, भाजपा शहर अध्यक्ष राहूल तुपसांडे, सूरज चौधरी, गणेश खंडाळकर, संतोष शिंदे, रुपेश वाघमारे आदीसह भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
 
 
कारंजा येथे सरकाररूपी दगडाला प्रतिकात्मक दुग्धाभिषेक
कारंजा येथील झाँसी राणी चौकात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकाररूपी दगडाला प्रतिकात्मक मानत दुग्धाभिषेक केला. दुधाचा दर कमी झालेला आहे. दुधाची खरेदी अतिशय कमी दराने होते आहे. या संदर्भात निवेदनही दिले होते. मात्र, त्यावर ना कुठली चर्चा झाली ना निर्णय झाला. त्यामुळं आमच्यावर आंदोलनाची वेळ आली असल्याचे मत पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले.
 
 
यावेळी तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, शहराध्यक्ष ललित चांडक, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विजय पाटील काळे, जयकिसन राठोड, तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे, माजी शहराध्यक्ष संदीप गढवाले, शहर सरचिटणीस शशिकांत वेळुकर, रंजीत रोतेले, अविनाश फुलंबरकर, तालुका सरचिटणीस श्रीकृष्ण मुंदे, भाजयुमो तालुकाध्यक्ष मंगेश धाने, शहराध्यक्ष अमोल गढवाले, आदी प्रमुख पदाधिकार्‍यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेत सरकारचे विरोधात घोषणा दिल्यात.