पोलिसावर चढवली बुलोरो; तिघांना अटक

    दिनांक :12-Aug-2020
|
तभा वृत्तसेवा
वर्धा,
वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यावर अज्ञातांनी बुलेरो वाहनाने चढवत हल्ला केला. ही घटना आज 12 रोजी कापसी येथे सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी अविनाश काळे, अतुल काळे, मंगला काळे रा. डौलापूर यांच्या विरुद्ध अल्लीपूर पोलिसात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली .
 
 
police_1  H x W
 
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्लीपूर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सत्यप्रकाश काकन हे वर्धा-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर कापसी येथे कर्तव्यावर होते. दरम्यान, यवतमाळ येथून वर्धेकडे येत असलेल्या एम. एच. 32 ए. जे. 2101 क्रमांकाच्या वाहन चालकाला ई पास विचारण्यापूर्वीच त्याने शिपायाच्या अंगावर बुलोरी चढवली. कसाबसा शिपायाने स्वत:चा जिव वाचवला. शिपायाने जिल्हा पास परवाण्यासंदर्भात विचारणा केली असता शिवीगाळ करत वर्दीवर असलेल्या शिपायाला मारहाण करून पळ काढला. या प्रकरणी अल्लीपूर पोलिसात गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती अल्लीपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार योगेश कामाले यांनी दिली.